Home देशविदेश संस्कृती, विकृती आणि व्यवस्था…

संस्कृती, विकृती आणि व्यवस्था…

      संस्कृती म्हणजे स्वतःचे हित साधने सोबतच इतरांच्या हिताचे आणि सुख दुःखाचे बद्दल विचार करणे आणि ते अमलात आणणे , काया वाचा मनाने दुसऱ्यांना दुःख न देणे,असे वर्तन म्हणजेच सहकार्य सहयोग,मदत,आदर,दया,माया,क्षमा, शांती,अहिंसा,प्रेम,औदार्य,मनाचा मोठेपणा,सत्य वर्तन,सत्य बोलणे,शुद्ध पवित्र नजर,संवेदनशीलता, दुःखात त्रासात अडचणीत असलेल्यांना मदत करणे,अन्याय अत्याचार भ्रष्टाचारास पाठीशी न घालणं,वेळप्रसंगी शौर्याचे प्रदर्शन करणे,एखाद्याचा जीव वाचविणे,त्याच्यावरील संकट त्रास नाहीसा होईल अशी मदत करणे,यालाच शुद्ध पवित्र विचार आचरण म्हणतात.असे विचार आचरण म्हणजेच सुसंकृत माणूस,किंवा सुसंकृत समाज होय.म्हणजेच संस्कृत व्यवस्था होय.अशा व्यवस्थेतच स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय,समाजवाद,धर्मनिरपेक्षता ,लोकशाही ही तत्वे ,सिद्धांत टिकतात.याच व्यवस्थेला समतावादी व्यवस्था असे म्हणतात.

       विकृती म्हणजेच मागासलेले आणि स्वार्थी विचार आणि वर्तन होय.अहंकार, राग,लोभ,द्वेष,मत्सर,सुडाची भावना,इतरांना त्रास देण्याची भावना आणि वर्तन, शोषणवादी, हिंसावादी,वर्चस्ववादी,भेदभाववादी विचार वर्तन ज्या व्यवस्थेतील लोक करतात,ती व्यवस्था म्हणजेच विषमतावादी व्यवस्था होय.अशा व्यवस्थेत मानवी हक्काचे संरक्षण होणे शक्य नाही,आणि समाजवादी लोकशाहीवादी संविधान अमलात येणे फारच कठीण होते,अशा विकृत माणसांच्या आणि व्यवस्थेच्या वातावरणात स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही मूल्य अमलात येणे शक्य नसते.यासाठी समतावादी सुसंकृत व्यवस्थाच हवी असते.

    स्वार्थ म्हणजे प्रकृती,निस्वार्थ म्हणजे संस्कृती आणि मोह लोभ म्हणजेच विकृती होय.लोभ हे दुःखाचे आणि समस्यांचे कारण आहे,त्याचा त्याग केल्याविना दुःख आणि समस्या नष्ट होणार नाहीत.असे बुद्धाचे विचार आहेत.परंतु असे विचार विषमतावादी विकृत व्यवस्थेत रुजने शक्य नाही. बुद्धबीज रुजण्यासाठी समतेची भूमी हवी.म्हणजेच समतावादी व्यवस्था हवी.सुसंस्कार सुद्धा अशाच भूमीत आणि वातावरणात निर्माण होतात,टिकतात पण.

        प्रकृती,विकृती,संस्कृती यातील फरक समजून घेण्यासाठी हे लक्षात घेतले पाहिजे — आपल्या ताटातील आपण खाणे,दुसऱ्याच्या ताट न पाहणे,म्हणजे प्रकृती होय.आपल्या ताटातील इतरांना देणे,म्हणजे सोबतच्या किंवा शेजाऱ्यास सोडून न खाणे,किंवा त्याचा आधी विचार करूनच मग आपल्या ताटातील खाणे,म्हणजेच संस्कृती होय.आणि आपले ताटातील खाऊनही इतरांच्या ताटातील हिसकून किंवा चोरून घेणे म्हणजेच विकृती होय.

      आता या तीन पैकी कोणती संस्कृती किंवा व्यवस्था असली पाहिजे ते वाचकानीच ठरवायचे असते.

       लेखक : दत्ता तुमवाड

       सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : 28 जुलै 2025.फोन: 9420912209.