Home Maharashtra कारगिल विजय दिनी वृक्षारोपण व बाईक रॅलीने आळंदीत देशभक्तीचा जागर…

कारगिल विजय दिनी वृक्षारोपण व बाईक रॅलीने आळंदीत देशभक्तीचा जागर…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

आळंदी : कारगिल विजय दिनानिमित्त अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, आळंदी जनहित फाउंडेशन, आळंदी ग्रामीण रुग्णालय आणि विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने “एक पेड मां के नाम” या उपक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे वृक्षारोपण आणि प्लास्टिकमुक्त अभियान राबवण्यात आले.

         या वेळी वृक्षहाती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅली आळंदी परिसरातील विविध मार्गांवरून देशभक्तीमय वातावरणात मार्गक्रमण करत रुग्णालयात पोहोचली. रुग्णालय परिसरात विविध फळझाडे, औषधी वनस्पतींची लागवड आणि स्वच्छता मोहिमेद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.

        कार्यक्रमात माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, प्रा.दिलीप घुले, अर्जुन मेदनकर, डॉ.खेडकर, डॉ.भाग्यश्री ढाकुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयाचे कार्यकारी उपाध्यक्ष डॉ.कमलजीत कौर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. समारोप शिवभक्त कैवल्य टोपे यांच्या शिववंदनेने झाला.