ऋषी सहारे
संपादक
कुरखेडा :- तालुक्यातील मालेवाडा नजीकच्या चरवीदंड येथील रहिवाशी रतिराम सखाराम हलामी यांच्या मालकीची बैल जोडी पुराच्या पाण्यात वाहून गेली व मृत्यू मुखी पडली.
सविस्तर वृत्त असे की, कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा नजीकच्या चरवीदंड येथील शेतकरी रतीराम सखाराम हलामी वय ४२ वर्ष हे आपल्या शेतावरून बैलजोडी घेऊन घरी येत असताना नेवासा काटेंगे यांच्या शेता जवळील नाल्याला पूर आल्याने नाल्याच्या पुलांवरून येत असताना बैलाचा पाय घसरल्याने बैल पाण्यात गेला, जोडी टाकली असल्याने दुसराही बैल पुरात वाहत गेला.
आरडा ओरड केल्या नंतर गावातील इसमांनी मदत करून बैलांना बाहेर काढण्यात आले पण दोन्ही बैल मृत्यू पावले असल्याने त्या शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले आहे.गेल्या वर्षीच रुपये अंशी हजारला ही बैल जोडी खरेदी केली होती हे विशेष.
अचानक आलेल्या पुराने शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले असल्याने व रोवणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे तरी रतीराम यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी असे गावातील नागरिक बोलत आहेत.



