युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दर्यापूर तालुक्याची आढावा बैठक नुकतीच मुर्तीजापूर रोडस्थीत ढोकणे सभागृह येथे उत्साहात पार पडली.
या बैठकीला अध्यक्ष म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख पराग गुडधे हे अध्यक्ष म्हणून तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार गजानन लवटे होते उपस्थित होते. नेत्यांनी उपस्थित असलेल्या सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन केले.
आमदार गजानन लवटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गाव तीथे शिवसेनेची स्थापना करा. पक्षप्रमुख उद्धव साहेब ज्या व्यक्तीला उमेदवारी देतील त्या व्यक्तीला आपला उमेदवार म्हणून प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी तत्पर असल पाहिजे असे विचार मांडले. त्याचप्रमाणे जिल्हा समन्वयक प्रदीप वडतकर यांनी मनोगत व्यक्त करताना दर्यापूर तालुक्यातील व नगरपरिषद भागातील संपूर्ण माहिती देऊन सर्कल निहाय जिल्हा परिषद व नगर परिषद हद्दीतील वार्ड निहाय शिवसेना पदाधिकारी यांच्या नियुक्त्या १५ दिवसात नियुक्ती करण्यात येतील असे आश्वासित केले.
पराग गुडधे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषद सर्कल प्रमुख, पंचायत समिती सर्कल प्रमुख व दर्यापूर शहरातील पदाधिकारी यांना आवाहन केले की येत्या निवडणुकी आधी तळागाळापर्यंत आपल्या पक्षाच्या बैठका घेऊन पक्ष बांधणी करायची आहे. त्याकरिता स्वतः सर्व सर्कल पिंजून काढीत पक्ष मजबूत करण्याकरता मी उपस्थित राहणार आहे. एकेक शाखाप्रमुख, प्रभाग प्रमुख आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व पक्षातील मतभेद बाजूला ठेवून आपण पक्ष बांधण्यासाठी काम करावे असे आवाहन केले.
सदर बैठकी दरम्यान किशोर टाले, गुणवंत गावंडे, अनुराधा गावंडे यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील कार्याबाबत शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन गणेश साखरे यांनी केले. यावेळी मंचावर प्रतिभा बोपशेट्टी,ज्योती अवघड, प्रदीप वडतकर,बबनराव विल्हेकर तालुका प्रमुख प्रमोद धनोकर ,महेंद्र दिपटे,गोपाल अग्रवाल,विकास येवले,सागर गीरे,मोहन बायस्कार, सतिश साखरे यांची उपस्थिती होती. सदर आढावा बैठकीस दर्यापूर तालुका उपतालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्कल प्रमुख, शाखाप्रमुख शिवसेना युवा सेना, महिला आघाडी, शिवप्रेमी, शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने उपस्थित होती.



