Home Maharashtra संत नामदेव महाराज मंदिराचा जिर्णोद्धार होणार :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

संत नामदेव महाराज मंदिराचा जिर्णोद्धार होणार :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

पंढरपूर : संत शिरोमणी नामदेव महाराज, त्यांचा परिवार आणि संत जनाबाई यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथील संत नामदेव महाराज मंदिराचा जिर्णोद्धार करण्याची घोषणा केली. नामदेव महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी सांगितले.

          मुख्यमंत्री म्हणाले, “संत नामदेव महाराजांनी २२ राज्यांत भ्रमण करत भागवत धर्माचा प्रसार केला. त्यांच्या स्मारकासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. नामदेव पायरीचे दर्शन हे पांडुरंगाच्या दर्शनासारखेच पुण्यप्रद आहे.”

          कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी समाधीस्थळी भव्य स्मारक आणि मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी मागणी केली. त्यांनी सांगितले की, शासन संत परंपरा आणि सांस्कृतिक स्थळांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे.

        कार्यक्रमाला आमदार समाधान आवताडे, अभिजीत पाटील, रणजीतसिंह मोहिते पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, श्री नामदेव क्षत्रिय एकसंघाचे अध्यक्ष महेश ढवळे, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अभिनेता गोविंदजी नामदेव, तसेच संत परिवाराचे वंशज, अधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

         या कार्यक्रमात विशेष संकेतस्थळाचे उद्घाटन आणि संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त तयार करण्यात आलेल्या चांदीच्या विशेष नाण्याचे विमोचन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.