ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली – स्थानिक नंदलाल पाटील कापगते विद्यालय,साकोली येथे भारतीय असंतोषाचे जनक लो.बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षा व प्रमुख अतिथी यांनी टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी टिळकांच्या जीवनपटावर गीत व भाषणे सादर केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.आर.बी.कापगते यांनी टिळकांच्या जीवनावर प्रकाश टाकला व टिळकांच्या अंगी असलेले नेतृत्वक्षमता,निर्भयता,संघटन कौशल्य, धैर्य ,स्वाभिमान इत्यादी गुण विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आत्मसात करण्याचे आव्हान आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले तसेच जागतिक वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विद्यालयातील शिक्षकांसह शालेय परिसरात वृक्षारोपण केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मदत केली.कार्यक्रमाचे संचालन श्री.आर.व्ही.दिघोरे सर यांनी व आभार प्रदर्शन सौ.एस.वाय.कऱ्हाडे मॅडम यांनी केले.



