Home Social उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त,लोकनेते महादेवराव बोडकेदादा विद्यालयाच्या प्रांगणात अजित वृक्ष पार्कची...

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त,लोकनेते महादेवराव बोडकेदादा विद्यालयाच्या प्रांगणात अजित वृक्ष पार्कची निर्मिती व वृक्ष लागवड…  — अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त प्रत्येक वर्षी हा उपक्रम राबविणार संचालक श्रीकांत बोडके…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

            महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयाच्या प्रांगणात अजित वृक्ष पार्कची निर्मिती करून वृक्षारोपण करण्यात आले.

              पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील लोकनेते महादेवराव बोडकेदादा विद्यालयाच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात केक कापून साजरा करण्यात आला.

           सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक व माजी आदर्श सरपंच श्रीकांत शिवाजी बोडके यांच्या मार्गदर्शना खाली व विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत कोरटकर सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत लोकनेते महादेवराव बोडकेदादा विद्यालयाच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

        यानिमित्त विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्या गणवेश वह्या पेन व फळे आणि मिठाईचेही मोठ्या प्रमाणात वाटप करून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

          या कार्यक्रमाप्रसंगी साखर कारखाना संचालक श्रीकांत बोडके बोलत असताना म्हणाले की.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना शुभेच्छा देऊन पुढील भावी आयुष्य सुख समाधान व शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

         अजितदादा पवार साहेब व इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते क्रीडामंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रयत्नाने पिंपरी गावचा विकास जोराने चालू आहे संपूर्ण गावचा कायापालट झालेला आसुन इथून पुढेही मामांच्या माध्यमातून गावासाठी जास्तीत जास्त निधी आणून गावाचाचांगल्या प्रकारे विकास करून पिंपरी बुद्रुक गावचे नाव लौकिक केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही संचालक श्रीकांत बोडके यांचे याप्रसंगी उद्गार.

         एक पेड मा का नाम या कार्यक्रमा अंतर्गत प्रथम नागरिक माजी चेअरमन बबन बोडके, संचालक व आदर्श सरपंच श्रीकांत बोडके, सरपंच सुदर्शन बोडके, विद्यमान सरपंच भाग्यश्री बोडके, माजी सरपंच ज्योती बोडके, उपसरपंच संतोष सुतार, पोलीस पाटील वर्धमान बोडके, मा. ग्रामपंचायत सदस्य समाधान बोडके, सतिश बोडके, ग्रामसेवक गणेश लंबाते, मोहन ढवळे, विकास नगरे, मुख्याध्यापक भरत कोरटकर सर सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी आप आपल्या स्वतःच्या आईच्या नावाने प्रत्येकी एक वृक्ष लावून विद्यालयाच्या प्रांगणात अजित वृक्ष पार्कची निर्मिती करण्यात आली. 

           क्रीडा मंत्री दत्तात्रय मामा भरणे, जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर,तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, सचिन सपकळ, नवनाथ रुपनवर, यांचे देखील पिंपरी बुद्रुक गावासाठी मोलाचे सहकार्य असतेच विद्यालयाच्या प्रांगणामधील अजित वृक्ष पार्कची निर्मिती केल्यामुळे लागवड करण्यात आलेले सर्व वृक्ष जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न राहतील.

            अजित वृक्ष पार्कच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना रूपाचे वाटपही करण्यात येणार व विद्यालयाच्या सर्व ठिकाणी वृक्ष लागवड करून नंदनवनच फुलणार असल्याचेही यावेळी श्रीकांत बोडके यांनी सांगितले.