Home Social निधन वार्ता… — काॅंग्रेसच्या जेष्ठ नेत्या काळाच्या पडद्याआड!…  — सुमन...

निधन वार्ता… — काॅंग्रेसच्या जेष्ठ नेत्या काळाच्या पडद्याआड!…  — सुमन उमाटे यांचे दुःखद निधन!…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी…

        चंद्रपूर शहरातील काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या सुमन भाऊराव उमाटे यांचे काल वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय 84 वर्षाचे होते.

         सुरुवातीपासूनच त्या कांग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिल्या! एवढेच नाही तर स्थानिक फिमेल एज्युकेशन सोसायटीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.अतिशय शांत व प्रेमळ स्वभावाच्या दिवंगत सुमन उमाटे यांच्या मागे पती, दोन मुले व दोन मुली आहेत.

          आज चंद्रपूरात पार पडलेल्या शोकसभेत चंद्रपूरचे ॲड.विजय मोगरे, सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी गुजरकर यांच्यासह अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.