शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची प्रारूप प्रभाग रचना नुकतिच पार पडली.यामध्ये तालूक्यातील किटाडी ( तूकूम ) हे ग्रामपंचायत क्षेत्र खडसंगी गण (गदगाव – खडसंगी निवडणूक विभाग ) यात जोडण्यात आले.
त्यामूळे किटाडी ( तू ) येथिल गावकऱ्यांत असंतोष पसरला आहे.किटाडी (तू) ग्रामपंचायत क्षेत्र मासळ ( बू ) गणाला ( मासळ (बू) – पळसगाव निवडूक विभाग ) जोडण्यात यावे या मागणीसाठी गावकऱ्यांनी तहसिलदार श्रीधर राजमाने यांच्या मार्फत राज्य निवडणूक आयोग ( म. रा. ) मुख्य निवडणूक अधिकारी यांना सोमवार ला निवेदन पाठविण्यात आले.
तालुक्यापासून १५ किमी अंतरावर किटाडी (तू) ग्रामपंचायत क्षेत्र आहे. या क्षेत्राची लोकसंख्या साडे सातशे असून मतदार चारशेच्या जवळपास आहे.यापूर्वी किटाडी (तू) हे ग्रामपंचायत क्षेत्र जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रभाग रचना १९९८ ते २०१७ या कालावधीत मासळ (बू) या गणात सामाविष्ठ होते. भौगोलिक दृष्ट्या किटाडी ( तू ) हे ग्रामपंचायत क्षेत्र विचारात घेतले असता पश्चिम दिशेला जागतीक ताडोबा अभयारण्यचे जंगल राखीव आहे.
उर्वरित पूर्व,उत्तर व दक्षिण दिशेला मासळ (बु) गणाच्या सिमा आहेत. किटाडी (तू ) या ग्रामपंचायत क्षेत्रातील आम्हा सर्व गावकरी लोकांना वाहतूकीचे किंवा संपर्काचे दृष्टिकोनातून खडसंगी गणातील खडसंगी या गावापर्यत जाण्याकरीता मासळ या गणाचे क्षेत्र चिमूर नगर परिषद व गदगाव गणाचे क्षेत्रामधून जवळपास २० किमी अंतर पार करावे लागते.
भविष्यात किटाडी ( तूकूम ) या ग्रामपंचायत क्षेत्राच्या विकासाकरीता गंभीर अडचन निर्माण होवू शकते.त्यामुळे भौगोलिक सिमांचे विचार केले असता फिटाडी (तू) हे ग्रामपंचायत क्षेत्र मासळ (बु) गणामध्ये ( मासळ (बु) – पळसगाव निवडणूक विभाग ) सामाविष्ट करने सोयीचे होईल. असे निवेदनात म्हटले आहे.
१२ जून २०२५ मधील परिच्छेद मुद्दा क्र. ३,४ व ३,६ नुसार एखादया अपवादात्मक परिस्थितीत प्रभागाची लोकसंख्या या किमान किंवा कमाल मर्यादेपेक्षा कमी किंवा जास्त असेल तर त्याची कारणे नमूद करून एकत्र करण्याची मुभा देण्यात आली आहे.
त्यामूळे सदर ग्रामपंचायत क्षेत्र मासळ (बु) गणामध्ये (मासळ (बु) – पळसगाव निवडणूक विभाग ) जोडता येवू शकते.
सदर बाबीनुसार गावकऱ्यांची मागणी रास्त आहे.त्यामुळे किटाडी ( तू ) हे ग्रामपंचायत क्षेत्र मासळ (बू) गणात (मासळ (बु) – पळसगाव निवडणूक विभागात सामाविष्ट करण्यात यावे. या रास्त मागणीचा विचार न केल्यास होवू घातलेल्या जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूकीवर किटाडी ( तू ) येथिल सर्व गावकरी बहिष्कार करणार आहेत.
निवेदन देताना किटाडी (तू) येथील माजी उपसरपंच महेंद्र बारसागडे,सहादेव पोहीनकर,देविदास सहारे,विकास खाटे,सखाराम पाटील,अनिल मेश्राम,वासुदेव रासेकर,संतोष पोहिनकर,राहुल बारसागडे,कवडू रंगारी,राष्ट्रपाल मेश्राम आदि गावकरी उपस्थित होते.
दरम्यान एकशे तिस सह्याचे निवेदन राज्य निवडणूक आयोग (म रा) मुख्य निवडणूक अधिकारी,नागपूर विभाग विभागीय आयुक्त,चंद्रपूर जिल्हाधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी,चिमूर अप्पर जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.



