Home Social कु.मेहंदी चंदनखेडेंचा उमरेड नगरीत सत्कार!… — दक्षिण कोरियात केले होते मेहंदींने...

कु.मेहंदी चंदनखेडेंचा उमरेड नगरीत सत्कार!… — दक्षिण कोरियात केले होते मेहंदींने भारताचे प्रतिनिधित्व!…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी…

        दक्षिण कोरियात उमरेडच्या उच्च शिक्षित कु.मेहंदी चंदनखेडेने भारताचे प्रतिनिधित्व करत उत्तम कामगिरी बजावली होती.त्याच निमित्ताने मेंदीचे कौतुक व अभिनंदन करण्यासाठी उमरेड येथील संताजी फाउंडेशनच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

       परंतु काही आवश्यक शैक्षणिक कामानिमित्त ती पुण्याला निघून गेल्यामुळे तिची आई सोनाली चंदनखेडे ही कार्यक्रमाला उपस्थित राहीली.

        त्यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला अर्थात मेहंदीचा हा सत्कार त्यांनी स्विकारला.