Home Maharashtra महामंडळ कर्मचाऱ्यांचा प्रवाशासोबतचा अरेरावीपणा :- आजाद समाज पार्टी संतप्त… — 15...

महामंडळ कर्मचाऱ्यांचा प्रवाशासोबतचा अरेरावीपणा :- आजाद समाज पार्टी संतप्त… — 15 ची पाणी बॉटल 20 ला विक्री, पुन्हा तक्रार आल्यास आगारातून एकही बस बाहेर जाऊ देणार नाही :- “राज बन्सोड” यांच्या इशारा…

ऋषी सहारे 

   संपादक

    गडचिरोली : एस टी महामंडळ सेवा ही विशेषतः गोर गरीब, मजूर, शेतकऱ्यांसाठी शासन देत आहे. ज्यांच्याकडे दुचाकी, चार चाकी आहे असे धनाढ्य लोक सहसा बस ने प्रवास करताना दिसत नाही. त्यामुळे यांच्या प्रवासामुळे महामंडळ व येथील कर्मचारी टिकून आहेत त्यांचा प्रवाशांशी व्यवहार हा सन्मानपूर्वक असला पाहिजे. परंतु महामंडळ कर्मचारी प्रवाशांशी असभ्य व अरेरावी वागत असल्याचा आरोप करत आजाद समाज पार्टी च्या वतीने आगार प्रमुखास यावर आळा घालण्यासाठी निवेदन देण्यात आले. 

         आजाद समाज पक्षाकडे गत महिन्यात जवळपास 3 ते 4 तक्रारी प्राप्त झाल्या की आपल्या वाहकांचा प्रवाशांशी व्यवहार हा फार जास्त अरेरावचा असतो जणू काय एस टी महामंडळ त्यांच्या घरचीच आहे. गोर गरीब जनता हे निमूटपणे सहन करते. गरीब विद्यार्थी तिथ प्रवास करतात आणि आत्ताच 4 दिवसापूर्वी वाहकाने येवली यथील एका विद्यार्थ्यास मारहाण केल्याची तक्रार प्राप्त झाली. तसेच काही दिवस आधी वैरागड येथे जाणाऱ्या बसचा वाहक नेहमी मुलींची छेडखानी करत असतो अशी तक्रार आली, देऊळगाव येथे एका लहानशा लेकराला घेऊन जात असलेल्या बाईसोबत वाहकाने असभ्य व्यवहार केला. अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.

        त्याच प्रमाणे शासकीय नियमानुसार आगार परिसरातील कॅन्टीन ही सामान्य लोकांसाठी असून तेथील वस्तूचे रेट नियमबाह्य पद्धतीने वसुल केले जात आहे. 15 रु. ची पाणी बॉटल ही 20 रु. मध्ये विकली जाते व याकडे प्रशासन दुर्लक्ष करते. 

मागण्या…

1. प्रवाशांशी असभ्य वर्तुणूक करणाऱ्या वाहकांवर, कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा. 

2. प्रवाशांशी सन्मानपूर्वक वागण्याचे त्वरीत आदेश देण्यात यावे.

3. कॅन्टीन चा करार रद्द करण्यात यावे व नवीन कॅन्टीन चालकास रेट बोर्ड लावण्याची सक्ती करण्यात यावी.  

         यापुढे महामंडळ कर्मचारी हे अरेरावी व असभ्य वागत असल्याची तक्रार आल्यास आगारातून एकही बस बाहेर पडू देणार नाही असा इशारा आजाद समाज पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.