Home Social कवयित्रीचे असेही एक मोबाईलला पत्र….

कवयित्रीचे असेही एक मोबाईलला पत्र….

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

     चंद्रपूर जिल्ह्यातील एका कवयित्रीने चक्क मोबाईलला एक पत्र लिहिले त्यात त्यांनी आपले अनुभव कथन केले.

प्रिय मोबाईल,

    सप्रेम नमस्कार वि. वि.

        तुला पत्र लिहिण्याचे कारण हेच आहे की,, मला सहज सुचलं परिवाराने आठवण करून दिली की तुझं माझं किती प्रेम आहे. तूझ्यावाचून करमेना असं झालं आहे.

          माझा वाढदिवस तसेच लग्नाचा वाढदिवस तुझ्यामुळे खूप उत्साहात साजरा झाला .तुझ्यामुळेच तर मला सर्व नातलग विडिओ द्वारे दिसले आणि बोलले देखील !मला खूप बरं वाटलं… ! विशेष म्हणजे तुझ्यामुळेच खूप फोटो काढण्यात आले. लहान मुले तर रडता रडता तुला हातात दिले की एकदम चूप होतात काय जादू आहे तुझ्यात?सुख दुःख बातमी लवकर कळत आहे.

         आज तूझ्यामुळेच व्यवसायात माझी प्रगती झाली. कारण खरेदीला जावं लागत नाही तूच माझ्या मालाचे आर्डर देतो आणि घेतो पण. कुणाजवळ पैसे नसले तरी तु फोन पे नी मिळवून देतो. मी तुला कधीच विसरू शकत नाही तुझ्यामुळे खूप सारे कामं होत आहे माझे.

         श्रीमंत, गरीब असा भेदभाव नाही.. आज तू सर्वांचा सोबती बनला आहे. तुझ्यामुळे आज जगाची प्रगती होत आहे. तुला बरं नसले की आम्हालाही बरं वाटत नाही. तुला आराम करायला सांगते आणि मीच त्रास देते हो नं..!!

         तुझ्याशिवाय मला करमेना,तुझ्यामुळे माझं एक सुंदर अस्तित्व निर्माण झालं…सकाळीच तु भक्ती गीत ऐकवतो! त्यामुळे माझा पूर्ण दिवस छान जातो. पूर्वी तु नव्हता तेव्हा कसं काय चालायचं हा प्रश्न नेहमीच सतावतो. आजच्या घडीला तुझ्यामुळेच महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंला मी जुळल्या गेली आणि खूप मोठा जीवाभावाचा परिवार मिळाला.! हे तेवढंच खरं आहे.

         बघ माझी साथ कधी सोडू नको. तुझ्या तब्येतीची मी काळजी घेईन. तुला हिच विनंती..बरे असो..इथेच मी माझं पत्र संपवते.तुझ्या आठवणीत नेहमीच तुझी लाडकी मैत्रीण…

तूझ्या पत्र उत्तराची मी वाट बघणार बाय बाय!!!

चुक भूल माफ करशील ! 

             तुझीच मैत्रीण

सौ.शैला चिमड्यालवार सावली जि.चंद्रपूर महाराष्ट्र