रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी..
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त सेमाना विद्या व वनविकास प्रशिक्षण मंडळ, गडचिरोली द्वारा संचालित ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर , महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “करिअर कट्टा” या उपक्रमाअंतर्गत, दिनांक 15 जुलै 2025 रोजी निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचा करिअर संसद शपथविधी सोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री.यशवंत शितोळे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांनी आभासी पध्दती ने सर्व विद्यार्थ्यांना करिअर संसद शपथविधी बद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाची प्राचार्या डॉ. सुनंदा एस. आस्वले, आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. निलेश ठवकर, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संदीप सातव, रसायन शास्त्र विभागाची डॉ. वरदा खटी व करिअर कट्टा समन्वयक डॉ. मृणाल वऱ्हाडे उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या करिअर संसदेचे मंत्रीमंडळातील नवनियुक्त पदाधिकार्यांना प्राचार्या डॉ.सुनंदा एस. आस्वले यांच्या अध्यक्षतेखाली शपथ देण्यात आली. करिअर संसद २०२५-२६ चे नवनियुक्त पदाधिकारी, मुख्यमंत्री– कु. सानिया वानखेडे, नियोजन मंत्री- श्री. प्रीतम शेंडे, कायदे व शिस्तपालन मंत्री- पल्लवी गजभे, सामान्य प्रशासन मंत्री- विद्या नन्नावरे, माहिती व प्रसारण मंत्री- श्री. आशिष हाडगे, उद्योजकता विकास मंत्री- कु. आफरीन शेख, रोजगार स्वयंरोजगार मंत्री- श्री. सुरेंद्र धारणे, कौशल्य विकास मंत्री- कु. अल्फिया शेख, संसदीय कामकाज मंत्री- पायल गराटे, महिला व बाल्काल्यान मंत्री- कु. संचिता वैद्य, सदस्य- कु. सर्थिका बारेकर यांनी विविध पदांची शपथ घेतली. विद्यार्थांना करिअर कट्टा डायरी, नियुक्तीपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुनंदा एस. आस्वले यांनी आपल्या भाषणात सांगितले कि करिअर कट्टा उपक्रम विद्यार्थांच्या सर्वांगिक विकासासाठी आणि त्यांच्या वयक्तीक व्यक्तीमत्वाला विकसित करण्यासाठी महत्वाचा मध्यम आहे.
करिअर कट्टा समन्वयक डॉ.मृणाल वऱ्हाडे यांनी विविध स्पर्धा परीक्षा बद्दल मार्गदर्शन केले आणि सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन व आभार डॉ.मृणाल वऱ्हाडे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, आणि विद्यार्थी उपस्थित होते.



