Home Social मेघा धोटे यांचे सहज सुचलंशी अतुट नाते – मायाताई कोसरे…

मेघा धोटे यांचे सहज सुचलंशी अतुट नाते – मायाताई कोसरे…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

      विदर्भातील जेष्ठ साहित्यिक व दीर्घ कालावधी पासून निष्ठेने व प्रामाणिकपणे महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मार्गदर्शिकाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या मेघा धोटे यांचे नाते सहज सुचलंशी अतुट व घट्ट जुळले असून सामाजिक क्षेत्रासोबतच साहित्य क्षेत्रात त्यांची कामगिरी अतुलनीय व उल्लेखनीय असल्याचे मत उपराजधानी नागपूरच्या समाजसेविका तथा योगशिक्षिका मायाताई कोसरे यांनी आज व्यक्त केले.

            नागपुरातील एका कार्यक्रमाची सांगता झाल्या नंतर त्यांनी या प्रतिनिधीशी मनमोकळेपणे पंधरा मिनिटे संवाद साधला.सहज सुचलं हा गृप प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असून अनेक कर्तृत्ववान महिला व तरुणी ह्या गृपवर कार्यरत असल्याच्या कोसरे म्हणाल्या!

        मेघा धोटे यांचे कर्तृत्व फार मोठे आहे.त्यांची स्तुती व कौतुक करावे तेवढे कमीच आहे.त्या चंद्रपूर व नागपूर आकाशवाणीच्या कार्यक्रमात जावून आल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.रंज्जू दिलीप मोडक ह्या गत चार वर्षांपासून सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका असल्याचे त्यांनी परत एकदा सांगितले.