Home शैक्षणिक श्री ज्ञानेश्वर विद्यालयात पालक-शिक्षक संघाची नवी कार्यकारिणी जाहीर…

श्री ज्ञानेश्वर विद्यालयात पालक-शिक्षक संघाची नवी कार्यकारिणी जाहीर…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, आळंदी (देवाची) येथे इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी नियमानुसार पालकसभा संपन्न झाली. यावेळी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी पालक-शिक्षक संघाची नवीन कार्यकारिणी उत्साहात निवडण्यात आली.

        संघाच्या उपाध्यक्षपदी श्रेनिक अशोक क्षीरसागर, सहसचिवपदी रावसाहेब अच्युतराव ताठे तर सचिवपदी शिक्षिका यमुना कुऱ्हाडे यांची सर्वानुमते निवड झाली. यासोबतच माता पालक संघाचीही स्थापना करण्यात आली असून उपाध्यक्षा मनीषा केदार, सहसचिव सुरेखा लोहोर आणि सचिवपदी अनुराधा खेसे यांची निवड झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सूर्यकांत मुंगसे होते.

        त्यांनी पालक-शिक्षक संघाच्या माध्यमातून शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. माजी सचिव संजय कंठाळे यांनी वार्षिक अहवाल सादर केला, तर माजी उपाध्यक्ष कृष्णा शेळके यांनी संस्थेच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले.

        संस्थेचे खजिनदार डॉ.दीपक पाटील व सचिव अजित वडगावकर यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पालकांनीही शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्याचे आश्वासन दिले.