Home Social गौतम नगरमधील तिसऱ्या मोबाईल टॉवरच्या विरोधात शिवसेना आक्रमक…

गौतम नगरमधील तिसऱ्या मोबाईल टॉवरच्या विरोधात शिवसेना आक्रमक…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी…

भद्रावती :- शहरातील गौतम नगर (स्नेहल नगर) मध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या मोबाईल टॉवरच्या उभारणी विरोधात शिवसेनेच्या वतीने नगर परिषद भद्रावतीच्या मुख्याधिका-यांना एक लेखी निवेदन देण्यात आले.

       सदरहु परिसरात 20 मीटर व 100 मीटर अंतरावर दोन मोबाईल टॉवर या आधीच उभारले गेले असून, आता तिसरा टॉवर उभारल्यास परिसरातील नागरिकांवर रेडिएशनचा गंभीर धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे स्थानिक हृदयरोगी वृद्ध नागरिकांचे आयुष्य धोक्यात येईल अशी भिती निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

मोबाईल टॉवरमधून होणाऱ्या रेडिएशनमुळे…

      कर्करोग, हृदयविकार, झोपेचे विकार, मानसिक तणाव, लहान मुलांमध्ये बौद्धिक परिणाम, प्रजनन क्षमतेवर घातक परिणाम,असे आजार वाढीस लागतात, हे शास्त्रशुद्धपणे सिद्ध झाले आहे.असेही निवेदनात म्हटले आहे.

      याच पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी ही तक्रार शिवसेनेचे शिवसैनिक सुरज शाहा यांच्याकडे केली आहे.त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या मार्गदर्शनात आणि सुरज शाहा यांच्या नेतृत्वात नगर परिषदेच्या मुख्याधिका-यांना निवेदन सादर करण्यात आले.

     शिवसेनेच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे की, जर सदरहु मोबाईल टॉवरचे काम तात्काळ थांबवण्यात आले नाही, तर जनहितार्थ तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल. 

           यावेळी शिवसैनिक सुरज शाहा, शिवसैनिक सुमित हस्तक, उपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम, शिवसैनिक दीप गारघाटे, शिवसैनिक राज चव्हाण, सुधीर मत्ते, निखिल उताने, रोशन चोधरी, अरुण मत्ते, शिवाजी तेलंग, बंडू कोरडे, नितीन रामटेके, मनोज गेडाम, लता मत्ते, सुनीता उताने, वैशाली तेलंग, प्रिया तेलंग, नंदा ठमके, संजू ठमके, गंगा ठमके, सरस्वती दानव, प्रगती शिंदे, जोशना फुकट, नंदा कोरडे, उज्वला चिलके, मीना अरोरा, अश्विनी मत्ते व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.