Home Maharashtra सातारा येथे वन विभाग अंतर्गत ऑनलाईन सेवा केंद्राचे उदघाट्न.. — एका...

सातारा येथे वन विभाग अंतर्गत ऑनलाईन सेवा केंद्राचे उदघाट्न.. — एका सुशिक्षित बेरोजगार महिलेला रोजगार…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी.. 

    चिमूर तालुक्यातील मौजा सातारा येथे वन विभागांतर्गत आँनलाईन ई-सेवा केंद्राचे उद्घाटन वन विभाग अधिकारी,सातारा येथील सरपंच आणि गावातील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.

       याप्रसंगी राऊत मॅडम वनपरीक्षेत्र अधिकारी,बोपचे वनरक्षक,सातारा ग्रामपंचायतचे सरपंच गजानन गुळधे,रतिराम कोडापे,भाग्यवान ढोणे,दिनेश कोडापे,सुरज ढोणे,महेश नन्नावरे,निखिता बारेकर,वैष्णवी शेडामे यांची उपस्थिती होती.

           वन ई-सेवा केंद्राद्वारे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वन विभागाकडून ऑनलाईन पुरवण्यात येणाऱ्या सेवा,ई-पास,पशुधन नुकसानी,शेतपीक नुकसानी,वन्यप्राणी हल्ला नुकसानी,मालकी केसेस खसरा प्रकरणे,आदिवासी अर्जदाराकरीता बिगर नागरिक क्षेत्रांमध्ये झाडे तोडण्याकरीता परवानगी,वन्यजीव क्षेत्रात पर्यटन हंगामात फोटोग्राफीसाठी परवानगी,वनेत्तर जमिनी बाबतचा दाखला,वनहद्दीपासून अंतराचा दाखला मिळविण्याकरीता अर्ज आणि इतरही ऑनलाईन सेवा या ई-सेवा केंद्रात उपलब्ध आहेत.

       याचबरोबर इतर सेवा संदर्भात ऑनलाईन अर्ज वन ई-सेवा केंद्र वरून सादर करण्यात येणार आहेत.