शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
साहित्य क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या व आज पावेतो अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या विदर्भातील प्रख्यात जेष्ठ साहित्यिक विजया भांगे यांचे महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या उपराजधानी नागपूरच्या मुख्य मार्गदर्शिका समाजसेविका मायाताई कोसरे, राजूराच्या अधिवक्ता मेघा धोटे या शिवाय अधिवक्ता अंजली गुंडावार, संजीवनी धांडे, रजनी रणदिवे,किरण साळवी, शैला चिमड्यालवार, साधना धकाते, सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक सहसंयोजिका नलिनी आडपवार, विद्या पिंजरकर, कविता जुमडे, शिवानी झाडे, साक्षी वाडगूरे, चैताली आतराम, अंजली इटनकर, अधिवक्ता सारिका टेंभरे, अंजली खंडाईत- कोसूरकर , श्रध्दा परिमल यांनी अभिनंदन केले आहे.
विजया भांगे ह्या मुळच्या विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट येथील रहिवाशी आहेत.त्या सेवानिवृत्त शिक्षिका आहे.सध्या त्या ठाणे येथील मनस्पर्शी साहित्य परिवार गृप मध्ये विजयाक्षर या सदरात साप्ताहिक साहित्य लेखन करीत आहे.त्यांनी या आधीही महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल गृपवर स्तंभ लेखन केले हे विशेष !



