ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली,: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१६ जुलै २०२५ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे आयोजन करण्यात येत आहे.
कंपनीचे नाव
के.एल. ग्रुप हैद्राबाद
पदाचे नाव – असोसिएट
पद संख्या ३००
सदर कंपनी उपस्थित राहणार असून उमेदवारांना रोजगाराचा लाभ घेण्यासाठी सदर रोजगार मेळाव्याकरिता ईच्छुक असलेल्या उमेदवारांनी स्वतःचा बायोडाटा, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चाने दि. १६ जुलै २०२५ श्री शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयाने आवाहन केले आहे.
अधिक माहितीकरिता कार्यालयाशी संपर्क साधावा. असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांनी कळविले आहे.


