Home Social पथ्रोटच्या प्रख्यात जेष्ठ लेखिका विजया भांगे यांचा नामवंत सहज सुचलं परिवार ते...

पथ्रोटच्या प्रख्यात जेष्ठ लेखिका विजया भांगे यांचा नामवंत सहज सुचलं परिवार ते मनस्पर्शी साहित्य परिवार पर्यंतचा प्रवास..

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

      कला,क्रीडा,शैक्षणिक, साहित्यिक संगीत व सामाजिक क्षेत्रातील महिला व तरुणींना सदासर्वदा प्रोत्साहन देणा-या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका व अमरावती जिल्ह्यातील पथ्रोटच्या प्रख्यात जेष्ठ लेखिका विजया भांगे यांनी आजपर्यंत विपूल प्रमाणात साहित्य लेखन केले असून त्यांना वैदर्भीय वृत्तपत्राच्या दिवाळी अंकातील कथेसाठी या पूर्वी सर्वोत्तम कथेचा पुरस्कार बहाल झाला आहे.

      नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गत काही वर्षांपासून नियमीतपणे सुरू असलेल्या सहज सुचलं या व्हाॅट्सअप गृपवर कार्यरत आहेत.त्यांनी बरेचदा या गृपवर स्तंभ लेखन केले आहे.

          उत्तम लिखाणासाठी अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या विजया भांगे ह्या एक सेवानिवृत्त शिक्षिका आहे.त्या आता ठाण्याच्या मनस्पर्शी साहित्य परिवार गृप मधील विजयाक्षर या सदरात साप्ताहिक लिखाण करीत आहे.

      ठाणे येथील मनस्पर्शी साहित्य परिवारात आजपर्यंत त्यांनी स्तंभ लेखन केले आहे.

       मनस्पर्शीमुळे माझ्या लिखाणाचं बळ वृध्दिंगत झाले.त्यामुळेच आज विजयाच्या अक्षराला आश्वासक आधार मिळाला म्हणूनच “विजयाक्षर “या सदरात लिहिण्याचे आपण ठरविले अश्या शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

       आपण आपल्या लिखाणातून योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याच्या विजया भांगे या वेळी म्हणाल्या..‌

विजया भांगे यांनी केली सहज सुचलंची प्रशंसा !…..

      प्रख्यात जेष्ठ साहित्यिक विजया भांगे यांनी महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं वरील सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार,वैजयंती गहुकर,कु.मंगल मिसाळ,जागतिक पुरस्कार कवयित्री कु.अर्चना सुतार, सविता कोट्टी सरोज हिवरे, प्रा.सुनंदा पाटील ,प्रा.वैशाली राऊत,मेघा भांडारकर,सीमा पाटील,अधिवक्ता अंजली गुंडावार,संजीवनी धांडे,डॉ.सुचिका बुक्कावार, विद्या पिंजरकर,रश्मि हिवरे,जयश्री मंगरूळकर,सोनाली चंदनखेडे,डॉ.कल्याणी सरोदे, विद्या पिंजरकर,प्रियंका बेन्द्रे,नूपुर मोडक,वंदना उपगन्लावार,उज्वला निमगडे,रश्मि पचारे,साक्षी वाडगूरे,प्रियंका गायकवाड,प्रांजू मखरे विजया तत्वादी,अंजली खंडाईत- कोसुरकर,मृणाली कांबळे,प्रांजली सेलोकर,चैताली आतराम,मनिषा मडावी,हिमानी वाकुडकर,चंदा कामडी,मोनाली पाटील,समता बन्सोड,मेहंदी चंदनखेडे,पोर्णिमा किर्तीवार,रंज्जू दिलीप मोडक,नलिनी आडपवार यांच्या अतुलनीय कामगिरीची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

     सहज सुचलं हा नवोदितांना प्रेरणादायी ठरणारा एक व्हाॅट्सअप गृप असून याचे संपूर्ण श्रेय मायाताई कोसरे व मेघा धोटे यांना जाते अश्या भांगे बोलताना म्हणाल्या.