शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) चंद्रपूरच्या महिला जिल्हाध्यक्षपदी किरण गंगाधर गेडाम यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई ब्रांदा येथील कार्यालयात त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.ही नियुक्ती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून या वेळी विदर्भ सचिव अशोक घोटेकर,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गौतम तोडे,गडचिरोली जिल्हाध्यक्ष मेघराज घुटके,बबिता गावंडे,लता पंधरे,पियुष गावंडे आदि उपस्थित होते.
विशेष म्हणजे किरण गेडाम ह्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या असून मागील कित्येक वर्षांपासून त्यांचे सामाजिक कार्यात मोलाचे योगदान राहिले आहे.



