Home Maharashtra येत्या १५ दिवसांत “त्यांना” कामावर न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा आपचा इशारा!…

येत्या १५ दिवसांत “त्यांना” कामावर न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा आपचा इशारा!…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

        चंद्रपूर शहराच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या वतीने कचरा संकलनाचे काम अर्बन एन्व्हायरो मॅनेजमेंट या खाजगी संस्थेला सोपविण्यात दिले आहे. या अंतर्गत अनेक वर्षे प्रामाणिक सेवा करणाऱ्या घंटागाडी कामगारांना अलीकडे कोणतीही पूर्वसूचना न देता आणि कोणतेही स्पष्ट कारण न देता कामावरून कमी करण्यात आले आहे. ही बाब केवळ अन्यायकारकच नव्हे, तर मानवी हक्कांच्या विरोधात असल्याचे आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

            सदरहु कंपनी व्यवस्थापकांकडून कामगारांशी सातत्याने गैरवर्तन, मेडिकल सुट्टी नाकारणे, कामाच्या सुरक्षिततेची कोणतीही हमी न देणे यासारख्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. यामुळे कामगारांमध्ये अस्वस्थता, असुरक्षितता आणि असंतोष सातत्याने वाढत चालला आहे.

        या अन्यायाविरोधात काल आम आदमी पार्टी चंद्रपूरच्या वतीने महानगरपालिका आयुक्त व कामगार सहायक आयुक्त चंद्रपूर यांना एक निवेदन देण्यात आले. या निवेदनात खालील मागण्या नमूद करण्यात आल्या त्या अश्या प्रकारे आहे.

अन्यायाने कामावरून कमी केलेल्या कामगारांची तात्काळ चौकशी करण्यात यावी.

पीडित कामगारांना १५ दिवसांच्या आत पुन्हा सेवेत बहाल करण्यात यावे.

कंपनीच्या मनमानी कारभारावर महानगरपालिकेने लक्ष घालावे.

कामगारांना त्यांच्या हक्काचे संरक्षण मिळावे.

         उपरोक्त मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आम आदमी पार्टीच्या वतीने घंटागाडी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

          निवेदन देते वेळी आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, शहराध्यक्ष योगेश गोखरे, अनुप तेलतुंबडे, अक्षय गोवर्धन तसेच अर्बन एन्व्हायरो मॅनेजमेंट कंपनीचे अन्यायग्रस्त कामगार उपस्थित होते.