Home Maharashtra कृषी उत्पन्न बाजार समितीचे कृषी भवन वादाच्या भोवऱ्यात!… — सहाय्यक निबंधकाकडे...

कृषी उत्पन्न बाजार समितीचे कृषी भवन वादाच्या भोवऱ्यात!… — सहाय्यक निबंधकाकडे लेखी स्वरुपात तक्रार दाखल…

युवराज डोंगरे 

उपसंपादक 

       दर्यापूर शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीने लाखो रुपये खर्च करून तालुक्यातील ग्रामिण भागातील शेतकरी, शेतमजूर यांच्या सोयीकरिता कृषी भवनाची भव्य इमारत उभारली व त्यावर नियंत्रण म्हणून स्थानिक सहायक निबंधक यांचे देखरेखी खाली तेथिल कारभार चालायला हवा मात्र असे प्रत्यक्षात दिसून येत नाही.

        कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कृषी भवनाचा कारभार पाहत असून त्यांचे व बाजार समितीचे व वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताने होत असलेला गैरप्रकार थांबला पाहिजे व सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी यांना न्याय मिळाला पाहिजे याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

       भामोद येथिल शेतकरी हरिदास सहदेवराव खडे यांनी कृषी भवन येथे त्यांच्या मुलीच्या डोहाळे कार्यक्रमाचे आयोजन दि 21जून रोजी केले होते. 

       त्यासाठी त्यांनी रितसर कृषी भवन बुक केले होते. नियमानुसार दोन हजार रुपयाची पावती ही देण्यात आली. बाकी कृषी भवनातील साहित्य व इतर सामानाच्या बाबत पैसे लागतील याबाबत साधी सूचना दिली नव्हती. कार्यक्रम संपल्यावर हरिदास खडे यांना 11000 रुपयाची मागणी केली. ती पूर्ण रक्कम खडे भरली. परंतु रक्कम भरल्या बाबत कुठल्याही प्रकारची पावती दिली नाही. याबाबत कृषी भवनाच्या व्यवस्थापनास विचारणा केली असता उडवा उडवी चे उत्तर देऊन खडे यांना अपमानित करण्यात आले.असा आरोप करण्यात आला आहे.

       याबाबतची तक्रार हरिदास खडे यांनी दर्यापूर येथिल सहाय्यक निबंधकाकडे लेखी स्वरूपात दाखल केली असून या तक्रारीवर सहाय्यक निबंधक यांच्याकडून काय कारवाई होणार याकडे दर्यापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया

       याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल गावंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कृषी भवनाच्या भाड्याच्या पावतीच्या रकमेत कुठलीही तफावत झाली नसल्याचे सांगितले. कृषी भवनाचा आर्थिक व्यवहार पाहणारी मुलगी ही सुटीवर असल्याने तक्रार कर्त्यास व्यवस्थापक हे 9 हजार रुपयाची रितसर पावती देऊ शकले नाही. कृषी भवन व बाजार समितीचा सर्व व्यवहार हा पारदर्शक आहे. तक्रार कर्त्यांची 11हजार रुपयाची पावती हीऑन रेकॉर्ड आहे. व तेवढी रक्कम ही बँकेत जमा सुद्धा झाली आहे.कृषी भवनच्या भाड्याच्या पावतीच्या रकमेत तफावत झाल्याचा हा गैरसमज आहे.

    सुनिल गावंडे 

सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, दर्यापूर