Home Maharashtra खरीप हंगामाला सुरुवात,जिवाची व श्रमाची पर्वा न करता शेतकरी राबराब राबतात शेतात…....

खरीप हंगामाला सुरुवात,जिवाची व श्रमाची पर्वा न करता शेतकरी राबराब राबतात शेतात…. — पत्नी व मुलांच्या भविष्यासाठी त्यांना कशाचीही भिती वाटत नाही! — शासन शेतकऱ्यांच्या शेतीला औद्योगिक दर्जा देणार काय? भरभरून आर्थिक मदत करणार काय?

उपक्षम रामटेके/शुभम गजभिये..

    पावसाळी म्हणजे खरीप हंगामात शेतकरी जिवाचे रान करतात.त्यांच्या कष्टाला सिमा राहात नाही.या हंगामात दलदल-चिखल,गवत,गचराकाडी,साप-विंचू आणि निसर्गाची कृपा व अवकृपा शेतकऱ्यांच्या सोबतीला असतात…

        प्रत्येक खरीप हंगामात स्वतःसह कुटुंबातील सर्व सदस्यांचे भविष्य त्यांच्या कष्टात दडलेले असते.यामुळे शेतकऱ्यांना मरण्याची भिती अजिबात राहात नाही….

            मुलांच्या भविष्याचा वेध घेताना ते मनाला मोठं करत आपल्या सुखदुःखाला सातत्याने बाजूला सावरतात.खरीप हंगाम म्हणजे शेतकऱ्यांची नवी उमेद व या उमेदी अंतर्गत त्यांच्या नव्या भविष्याच्या गाथेची सुरुवात..

       शेतकरी म्हणजे शेतीत काम करणारी व्यक्ती.ते अन्न,वस्त्र आणि इतर गरजेच्या वस्तूंचे उत्पादन करून समाजाला पुरवतात.ते नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करून शेती करतात. 

      शेतकरी अन्नधान्याचे उत्पादन करून समाजाचे पोषण करतात.त्यांच्या कष्टांमुळेच आपल्याला अन्न मिळते.

          शेतकरी खेड्यांमध्ये राहतात आणि ते ग्रामव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत.शेतकरी नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून पर्यावरणाची काळजी घेतात.शेतीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. 

       अनियमित पाऊस,दुष्काळ,पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान होते.याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असल्यामुळे उत्पादन कमी होते. 

       अनेकवेळा शेतकऱ्यांना कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ येते.योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी नुकसान सोसावे लागते.

       शेतकरी हा समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे.त्यांचे कष्ट आणि योगदान खूप महत्त्वाचे आहे.शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी सरकारने आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे…

          मात्र,शेतकरी खरीप हंगामाच्या भरवसावर स्वतःचे भविष्य रेखाटत असला तरी त्याच्या शेतीला भारत सरकार जो पर्यंत उधोगाचा दर्जा देत नाही तोपर्यंत त्यांच्या श्रमाचे मुल्य अमुल्य ठरत नाही व त्यांच्या शेतीतील उत्पादनाला बाजारपेठ आवश्यक भाव मिळत नाही..

        याचा अर्थ असा की भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत नाही असे दिसून येते..

           खरीप हंगामात भात,कपास,सोयाबीन,हळद,तुर,पिकांना प्राधान्य दिले जाते.ही पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागतय.तेव्हा कुठे देशातील नागरिकांना उपजिवीकांसाठी योग्य अन्नधान्याचा पुरवठा होतोय..

         शेतकऱ्यांच्या श्रमात आणि शेतकऱ्यांच्या शेतमालात देशातील नागरिकांचे जिवन अंतर्भूत असल्याने जगविख्यात प्रकांड पंडित-जगमान्य थोर समाजसुधारक-विश्वरत्न-भारतीय संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे शेतीला औद्योगिक दर्जा भारत सरकारने दिला पाहिजे..

       शेतकऱ्यांच्या हितासाठी भारत सरकारने दोन पाऊले पुढे टाकत त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आवश्यक योजना अंतर्गत शेतीचा विकास करावे व शेतीची सुपिकता वाढवावी.याचबरोबर शेतकऱ्यात भेदभाव न करता मोठ्या प्रमाणात त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावे,हेच भारत सुधारणेचे उत्तम कार्य ठरेल.

       शेतकऱ्यांनी भात रोवणीला सुरुवात केली असून कपास,सोयाबीन,हळद,तूर या पिकांची त्यांच्याकडून खुरपणी सुरू आहे.

       वृत्त संकलन

        उपक्षम रामटेके 

     मुख्य कार्यकारी संपादक 

        शुभम गजभिये 

          विशेष प्रतिनिधी