Home Maharashtra बल्हारपूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी किशोर नवले एक उत्कृष्ट चित्रकार!… —...

बल्हारपूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी किशोर नवले एक उत्कृष्ट चित्रकार!… — महसूल विभागातही उल्लेखनीय कामाबाबत नवले सन्मानित!…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

       चंद्रपूर जिल्ह्यात महसूल विभागात जे काही उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱे मंडळ अधिकारी आहेत. त्यात किशोर नवले यांची एक कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी म्हणून शेतकरी बांधवात व महसूल खात्यात ओळख आहे.

        सध्या नवले हे बल्लारपूर तालुक्यात मंडळ अधिकारी या पदावर गेल्या एक वर्षापासून कार्यरत आहेत.या पूर्वी त्यांनी घूग्गूसचे मंडळ अधिकारी म्हणून सात वर्षे जबाबदारी सांभाळली.

           तत्दपूर्वी त्यांनी याच तलाठी साजाचे तब्बल सहा वर्ष पटवारी म्हणून काम करीत जनतेचा विश्वास संपादन केला आहे.

      सर्व सामान्य जनतेसह त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपुलकीचे व प्रेमाचे संबंध आज पर्यंत जोपासले आहे.

       जनतेची कामे वेळीच हातावेगळी करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

              चंद्रपूर तालुक्यात कार्यरत असताना त्यांना 2023 मध्ये महसूल विभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी व चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी मुरगानंथम एम यांच्या प्रमुख उपस्थितीत एक सन्मान पत्र देवून सर्वोत्कृष्ट मंडळ अधिकारी म्हणून गौरविण्यात आले होते.ही त्यांच्या उल्लेखनीय कामाची एक पावतीच आहे.

       शालेय जीवनापासूनच त्यांना चित्रकलेची अमाप आवड आहे.त्यांनी आपल्या कुंचल्यातून राजकीय, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक व फिल्म जगत मधील अनेकांची छायाचित्रे उत्तम व सुरेखरित्या रेखाटली आहेत.बऱ्याच जणांनी चित्रकार किशोर नवले यांच्या कलेला दाद दिली आहे.

                    पटवारी संघटनेचे आधारस्तंभ व झुंजार नेते दिवंगत वि.म.उजवणे यांचेही छायाचित्र चित्र त्यांनी आपल्या कलेतून या पूर्वी सुंदररित्या व हुबेहूब रेखाटले आहे.एक उत्कृष्ट चित्रकार म्हणून त्यांची अख्ख्या विदर्भात ख्याती आहे.

       भविष्यात रेखाटलेल्या सुरेख छायाचित्रांचे एक भव्य प्रदर्शन चंद्रपूर महानगरीत भरविण्याचा त्यांचा मानस आहे.