Home Crime सुगंधित तंबाखू ची तस्करी करणाऱ्याचा पोलिसांनी मुसक्या आवळल्या… — ८१९६०० रु....

सुगंधित तंबाखू ची तस्करी करणाऱ्याचा पोलिसांनी मुसक्या आवळल्या… — ८१९६०० रु. किमतीचा मुद्देमाल जप्त…

ऋषी सहारे

  संपादक

आरमोरी – दिनांक 04/07/2025 ला तीन वाजताचे सुमारास सुगंधित तंबाखूचे वाहतुकी संबंधाने मूकबिराकडून मिळालेल्या विश्वासनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक गवते यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी / प्रताप लामतुरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाडे, विजय चलाख, पो. हवा /1991 किशोर मेश्राम, पो हवा/3131 रजनीकांत पिल्लेवान,पोशि/ कुमोटी, सुरनार, चा सफौं/1193 रमेश मगरे यांनी मौजा वासाडा येथील पटाची दान जवळ चामोर्शी माल गावाकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला दबा धरून बसले असता आरोपी नामे 1) सुनील सुदाम हनवते वय 21 वर्ष रा.चामोर्शीमाल 2) सुरेश वसंत राऊत वय 30 वर्ष रा. चामोर्शीमाल यांचे ताब्यातील मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर चार चाकी वाहन क्रमांक MH -31-EU-2667 ची सुगंधित तंबाखू संबंधाने पाहणी केली असता सदर वाहनाचे डिक्की मध्ये सुगंधी तंबाखू मिळून आला सदर सुगंधित तंबाखू बाबत नमूद आरोपींना विचारपूस केली असता त्यांनी सदर सुगंधित तंबाखू हा आरोपी नामे 3) गोपाल हरिराम निंबेकर वय -35 वर्ष रा. देऊळगाव तालुका आरमोरी यांनी त्याचे मालकीचे हुंदाई कंपनीचे सिमेंट रंगाचे एक्सेंट चार चाकी वाहन क्रमांक MH-33-V-0571 ने देऊळगाव गावाचे बाहेर पोहोचवून दिल्याचे सांगितले.

1) 5000/- रु. किमतीचा मज्जा 108 हुक्का शीशा कंपनीचे सुगंधित तंबाखू असलेल्या प्रत्येकी 200 ग्राम वजनाचे पाच नग सीलबंद तीन डबे प्रति डब्बा अवैध विक्री किंमत 1000/- रु.

2) 1700/- रु. किमतीचे ईगल कंपनीचे सुगंधी तंबाखू ने भरलेले प्रत्येकी 40 ग्रॅम वजनाचे 17 पाकीट प्रति पाकीट अवैध विक्री किंमत 100 रुपये याप्रमाणे 

3) 900/- रु. किमतीचे ओला हुक्का शीशा कंपनीचे सुगंधित तंबाखू असलेले प्रत्येकी 200 ग्रॅम वजनाचे 3 सीलबंद पाकीट प्रति पाकीट अवैद्य विक्री किंमत 300 रुपये याप्रमाणे 

4) 12,000/- रु किमतीचे ईगल होका शिशा कंपनीचे सुगंधी तंबाखू असलेले एका सीलबंद पाकीटमध्ये प्रत्येकी 200 ग्राम वजनाचे 5 नक सीलबंद पॅकेट असलेले असे एकूण 8 सीलबंद पॅकेट 8 किलोग्रॅम सुगंधित तंबाखू प्रति पाकीट अवैध विक्री किंमत 1500/- रु. याप्रमाणे 

5) 3,00000/- रु. सुगंधित तंबाखू वाहतूक करण्याकरिता वापरलेली आरोपी क्रमांक एक याचे ताब्यातील एक जुनी वापरती सुजूकी कंपनीची ग्रे रंगाची स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक MH-31-EU-2667 

 6) 5,00000/- रु. किमतीचे सुगंधित तंबाखू वाहतूक करण्याकरिता वापरलेले आरोपी क्रमांक तीन याचे ताब्यातील एक जुने वापरती सिमेंट रंगाचे हुंदाई कंपनीचे एक्सेंट वाहन क्रमांक MH-33-V-0571 

     असा एकूण 19600/- रुपयाचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व 8,00000/-रु. किमतीचे दोन चार चाकी वाहन असा एकूण 8,19,600/- चा माल वाहतूक करताना मिळून आल्याने, निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभाग गडचिरोली यांना कळवून त्यांनी दिलेल्या लेखी फिर्याद वरून नमूद आरोपीता विरुद्ध पोस्ट आरमोरी येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील तपास व उपनि संतोष कडाळे पोलीस स्टेशन आरमोरी हे करीत आहेत.