ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली, : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत सन २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षासाठी केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनांची आदिवासी भागांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी डाटा एंट्री ऑपरेटर पदावर मानधन तत्वावर भरती केली जाणार आहे. प्रती लाभार्थी दहा महिन्यांकरिता ही नियुक्ती असणार असून, केवळ अनुसूचित जमातीच्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी. त्याचबरोबर MSCIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास MS Excel आणि MS Power Point मध्ये काम करण्याचा अनुभव असावा. मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट या गतीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
स्थानिक गोंडी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असून, यासोबतच शासकीय कार्यालयात कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
संबंधित पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज दिनांक 11 जुलै 2025 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली येथे सादर करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांनी केले आहे.


