Home Maharashtra सीईओ संजीता महापात्र यांचा अचानक चिखलदरा दौरा…

सीईओ संजीता महापात्र यांचा अचानक चिखलदरा दौरा…

  अबोदनगो चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

     दखल न्युज भारत

        अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी आज चिखलदरा तालुक्यात गोपनीय व अचानक दौरा करत प्रशासनातील शिस्तबद्धतेचा आढावा घेतला. चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या एकताई, हलिदा, कुटीदा आणि हतरू या गावांना त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या.

             या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच ग्रामपंचायतींची पाहणी केली.भेटीच्या वेळी अनेक त्रुटी आढळून आल्या. काही शाळांमध्ये शिक्षक अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले. तसेच शालेय पोषण आहार मेनूनुसार तयार न करता खिचडी इतर पद्धतीने शिजविण्यात आल्याचे दिसून आले. याशिवाय पोषण आहाराच्या नोंदीचे रजिस्टरही उपलब्ध नव्हते.

            ग्रामपंचायतीमध्ये नियमित हजेरी नसणे, स्वच्छतेचा अभाव आणि आरोग्य केंद्रातील सेवकांची अनुपस्थिती याबाबत देखील तक्रारी आढळल्या.

        या निष्काळजीपणामुळे संबंधित शिक्षक, ग्रामसेवक, व इतर जबाबदार कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सीईओ श्रीमती संजीता महापात्र यांनी स्पष्ट केले.