Home Maharashtra पावसाळा सुरू होऊनही नालीसफाई नाही…  — प्रभाग 5 व 6 कडे...

पावसाळा सुरू होऊनही नालीसफाई नाही…  — प्रभाग 5 व 6 कडे पालिकेची दुर्लक्ष…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : शहरातील प्रभाग क्रमांक पाच व सहा येथील नाल्यांची नियमित सफाई होत नसल्यामुळे ऐन पावसाळ्यात नाल्यांना पूर येऊ शकतो. तसेच जागोजागी कचरा पडलेला आहे व पावसाळा सुरू असल्याने या कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे.

        शहरातील इतर लहान मोठ्या नाल्यांची सफाई नगरपरिषेकडून नियमित केली जात नाही.त्यामुळे वर्षातून एकदा या नालेसफाईला पावसाळ्यापूर्वी मुहूर्त मिळतो यावर्षी पावसाळा सुरू झाला तरी देखील नगरपरिषदेला अजूनही जाग आली दिसत नाही व या भागासाठी नगरपरिषदेकडून कुठले नियोजन नाही का? असा प्रश्न जनतेत सुरू आहे.

        पावसाळ्यात नाल्यांध्ये पाणी साचून ते नागरी वसाहतीत घुसू नये अथवा त्याच्या त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च करून नालेसफाई होत असते मात्र यावर्षी साकोली शहरातील प्रभाग पाच व सहा या भागातील नाल्यांमध्ये साफसफाई झाली नसल्याचा आरोप जनता करीत आहे.

       साकोली नगरपरिषदेला वारंवार सूचना देत नालेसफाई संदर्भात सांगितले असता लक्ष दिले नाही या किरकोळ कामासाठी सुद्धा आम्ही विरोधात आंदोलने करायची का? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो.

महेश पोगडे सामाजिक कार्यकर्ता…

       पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी या प्रभागातील नाल्यांची सफाई झालेली नाही पावसामुळे काही घाण वाहून गेली पण काही घाण नाल्यात व रस्त्यावर तसेच आहे त्यामुळे या परिसरात दुर्गंधी येते व नागरिकांना त्रास होतो.

पुष्पा बडोले सामाजिक कार्यकर्त्या…