उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
१० डिसेंबर २०२४ ला महाराष्ट्र राज्यांतर्गत परभणी येथे युगप्रवर्तक तथा भारतीय संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाची विटंबना करण्यात आली होती.या घटने नंतर आंबेडकरी जनतेकडून तिव्र पडसाद उमटले होते.
जगप्रसिद्ध प्रकांड पंडित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्प विटंबना प्रकरणी आंबेडकरी जनतेकडून आरोपींना अटक करण्यासाठी परभणी येथे शांततेत निषेध मोर्चा काढला होता.
या मोर्चानंतर जातीयवादी व मनुवादी विचारांच्या लोकांनी निळे दुप्पटे बांधून व टोप्या टाकून काही दुकानांची तोडफोड जाणिवपूर्वक केली व या घटनेला अनुसरून दंगल घडविण्यासाठी प्रयत्न केले होते,असे स्थानिकांचे म्हणणे होते.
मात्र,पोलिसांनी कोंबिंग आप्रेशन राबविताना विचार न करताच आंबेडकरी जनतेच्या घरात घुसून बळाचा वापर करीत अनेकांना बेदम मारहाण केली व बेकायदेशीर अत्याचार केला आणि अनेकांना अटक केली.यात सोमनाथ सुर्यवंशी यांचा सहभाग होता.
अटक केल्यानंतर पोलिस कस्टडीत असताना सोमनाथ सुर्यवंशी यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली.या मारहाणीत गंभीर दुखापती सोमनाथ सुर्यवंशी यांना झाली होती.त्यांचा मृत्यू १५ डिसेंबर २०२४ रोजी न्यायालयीन कस्टडीत झाला होता.सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी यांच्या मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असे त्यांच्या आईचे म्हणणे होते.
शवविच्छेदन अहवालानंतर सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असल्याचे स्पष्ट झाले.सोमनाथ सुर्यवंशी यांच्या शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यू प्रकरणातंर्गत पोलिसांचा बनवाबनवीचा प्रकार उघडकीस आला..
यामुळे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा कायदेतज्ज्ञ अँड.प्रकाश आंबेडकर यांच्या द्वारे सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईने संभाजी नगर खंडपीठात याचिका दाखल केली होती व या याचीकेद्वारे पोलिसांवर हत्या बाबत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
आज संभाजी नगर खंडपीठाचा निर्णय आला असून सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.



