उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
सार्वत्रिक निवडणुकातंर्गत भारत देशातील मतदारांची मते चोरण्यांचे काम,”ईव्हीएम मशीन करीत असून सार्वत्रिक निवडणूक दरम्यान,”भारताचे निवडणूक आयोग हे भारतातील करोडो मतदारांची मते चोरणारे सरदार आहे.यामुळेच भारत देशात मतांच्या चोरी द्वारे बेजबाबदार लोकप्रतिनिधीं निवडून येत आहेत असे मत भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांचे आहे…
यामुळे भारत देशातील निवडणूका या ईव्हीएम मशीन द्वारे न घेता मतपत्रिका द्वारे घेण्यात यावे यासाठी,”भारत मुक्ती मोर्चा,”राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा,”बहुजन मुक्ती मोर्चा,द्वारा भारत भर आंदोलनाला सुरुवात झाली आहे…
भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे भारत देशातील सखोल तत्वज्ञानी असून,”भारत देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुध्दा ते भारतातील मुलनिवासी नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी,भारत मुक्ती मोर्चा व इतर समविचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या सोबत रात्रंदिवस संघर्ष करीत आहेत…
ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूका या भारत देशातील नागरिकांच्या मुलभूत व इतर अधिकारांवर गधा आणणाऱ्या ठरलेल्या आहेत.यामुळे भारत देशातील नागरिकांच्या स्वातंत्र्याला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धोका निर्माण झालेला आहे…
भांडवलदारांच्या हितासाठी खाजगीकरणला अनन्यसाधारण महत्त्व देणे आणि भारतातील नागरिकांच्या अधिकारांना डावलने,हा भारत देशाच्या सत्ताधाऱ्यांचा कार्यपद्धत प्रकारच लोकशाही मुल्यांचे हनन करतो आहे हे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम ओळखून आहेत…
म्हणूनच त्यांनी ईव्हीएम मशीन द्वारे होणाऱ्या निवडणुकींना कायदेशीर व वास्तव विरोध केला आहे.
यामुळे त्यांच्या व इतर संघटनांच्या माध्यमातून आज सुरु असलेला भारत बंद महत्वपूर्ण असल्याचे मत आंदोलक व्यक्त करीत आहेत.


