Home Maharashtra राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आरमोरीत उत्साहात… — मार्क्सवादी कम्युनिस्ट...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आरमोरीत उत्साहात… — मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पुढाकार… — जातीय सलोखा व लोकशाही संरक्षण यावर विचारमंथन…

ऋषी सहारे

   संपादक

आरमोरी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने आरमोरी येथे दिनांक २६ जून रोजी आरक्षणाचे जनक, बहुजन उध्दारक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५६वी जयंती ‘जातीय सलोखा व लोकशाही संरक्षण’ यावर विचारमंथन करून उत्साहात साजरी करण्यात आली.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयकुमार मेश्राम हे होते.तर विशेष अतिथी म्हणून धर्मानंद मेश्राम,राज बन्सोड, ऍड.सोनाली मेश्राम,राजु सातपुते, डॉ.धर्मराज सोरदे,विठ्ठल प्रधान,लकी पाटील,सतीश दुर्गमवार आदी उपस्थित होते.

      मान्यवरांनी करवीर संस्थानचे राजे व बहुजन उध्दारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीतील प्रसंगाचे वर्णन केले.तसेच राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी व आर्थिक क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली आहे याला तोड नाही यावर भाष्य करीत ऐतिहासिक घटनांना उजाळा दिला.तसेच वर्तमान परिस्थितीत आपणास टिकून राहण्यासाठी जातीय व धार्मिक संघर्ष न करता शिक्षण व उद्योग जगतातील घडामोडी यावर विशेष भर देत, दुरदृष्टीकोन ठेवून समाजाची प्रगती साधावी लागेल.यातूनच राजर्षी शाहूंना अपेक्षित असलेले राष्ट्र घडेल असा संदेश दिला.

       प्रास्ताविकात माकपचे जिल्हा सचिव अमोल मारकवार यांनी मार्क्सवादी पक्षाचे ध्येयधोरणे,पक्षाची वाटचाल व भविष्यात येणाऱ्या धोक्याची सूचना यावर मार्गदर्शन केले.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रितेश अंबादे यांनी केले.तर आभार विठ्ठल प्रधान यांनी मानले.

      राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यावर अढळ निष्ठा असलेले स्त्री,पुरुष, युवा, कार्यकर्ते व मान्यवर मंडळी उपस्थित होते.

     कार्यक्रमाची सांगता सहभोजनाने झाली.