ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली, : सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, शासन परिपत्रकाच्या सुचनेनुसार लोकशाही दिन ०७ जुलै २०२५ रोजी (सोमवार), दुपारी ३.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहात आयोजित करण्यात येत आहे.
ज्या तक्रारदारांना जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा असल्यास त्यांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारीचे निराकरण होऊन प्राप्त झालेल्या अहवालावर समाधान न झाल्यास तहसिलदारांच्या उत्तराची प्रत व तालुका लोकशाही दिन टोकन क्रमांक प्रत जोडुन विहित नमुन्यातील (प्रपत्र-१ (ब)) अर्ज व त्यासोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडुन लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी पाठविणे आवश्यक राहील.
तसेच तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही असे जिल्हाधिकारी, गडचिरोली, अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.



