शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
उमरेडच्या मेहंदी चंदनखेडेंची इंटरनॅशनल काॅन्फरन्ससाठी निवड झाल्याने मायाताई कोसरे,मेघा धोटे,चंदा कामडी,मीनाक्षी गुजरकर,कविता जुमडे,कोकीळा पोटदुखे यांच्यासह अनेकांनी केले तिच्या यशाचे कौतुक व अभिनंदन!
मनात जिद्द व परीश्रम घेण्याची क्षमता असली की आपण कोणत्याही क्षेत्रात पुढे जावू शकतो हे विदर्भातील उमरेडच्या मेहंदी चंदनखेडे हीने प्रत्यक्षात खरे करून दाखविले आहे.
नागपूर जिल्ह्यातील उमरेडच्या महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या जेष्ठ पदाधिकारी व सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख श्रीमती सोनाली विठ्ठल चंदनखेडे यांची ती कन्या! तिचं पूर्ण नाव मेहंदी विठ्ठल चंदनखेडे !
फरगुशन कॉलेज पुणे येथून तिची एका प्रोजेक्ट संदर्भात दक्षिण कोरियासाठी निवड झाली.

भारताचे प्रतिनिधत्व करत ती दक्षिण कोरियात पोहोचली असून तिने तो प्रोजेक्ट आपल्या महाविद्यालयात यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.त्या प्रोजेक्टच्या प्रेझेंटेशन संदर्भात ती दक्षिण कोरियात गेली आहे.
विशेष उल्लेखनीय बाब अशी की तिथे एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती.त्या ठिकाणी 24 देशातल्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता.
त्या 24 देशातल्या विद्यार्थ्यांना मागे टाकून उमरेडच्या मेहंदी चंदनखेडे हिने प्रथम क्रमांकासह गोल्ड मेडल प्राप्त केले.यासोबतच तिने भारत देशाचे नाव रोशन केले आहे.ही बाब निश्चितच देशासाठी व समाजासाठी फार मोठी व अभिमानाची आहे.
गत दोन महिन्यापूर्वी वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले.पण कठोर परिश्रमाच्या भरोश्यावर मेहंदीने आपली जिद्द पूर्ण केली.
दरम्यान तिच्या या यशस्वी व उल्लेखनीय कामगिरीचे महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे,अधिवक्ता मेघा धोटे,विजया भांगे,विजया तत्वादी,साधना धकाते,कवयित्री शैला चिमड्यालवार,चंदा कामडी,अधिवक्ता अंजली गुंडावार,डॉ.सूचिता बुक्कावार,संजीवनी धांडे,अपर्णा चिडे,मीनाक्षी गुजरकर,प्रा.वैशाली राऊत,नयना झाडे,प्रा.सुनंदा पाटील,सविता कोट्टी,रजनी रणदिवे,किरण साळवी,कविता जुमडे,रंज्जू दिलीप मोडक,अधिवक्ता अंजली गुंडावार,अंजली इटनकर, प्रियंका गायकवाड, रश्मि हिवरे,रश्मि पचारे,राणी पाल,श्वेता मंडलवार,प्रियंका बेन्द्रे,माधूरी सोनटक्के,वैजयंती गहुकर,स्नेहा मडावी,चैताली आतराम,सुकेशिनी टेभूर्णें,नजमा शेख,रिना तेलंग,सरोज हिवरे,पूनम मडावी, शमनिषा मडावी,सुवर्णा लोखंडे,जयश्री मंगरूळकर,करुणा गावंडे,विद्या पिंजरकर,गायत्री श्रीरामे पूजा मंगाम,पोर्णिमा किर्तीवार, व नलिनी आडपवार यांनी तिचे अभिनंदन करत तिला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.



