Home Maharashtra ग्रामगीता महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151 वी जयंती साजरी…

ग्रामगीता महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151 वी जयंती साजरी…

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

    शुभम गजभिये 

       विशेष प्रतिनिधी 

      ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151 वी जयंती विद्यार्थी शिष्यवृत्ती समिति द्वारा साजरी करण्यात आली. महाराष्ट्र शासना तर्फे हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून पण साजरा करण्यात येते. 

      कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्या डॉ. सुनंदा अस्वले यांनी आपल्या मार्गदर्शना मधे सांगितले की छत्रपती शाहू महाराज केवळ राजे नव्हते तर ते समाजाचे सुधारक आणि शिल्पकार होते. यांनी शिक्षण, सामाजिक समता, आरक्षण आणि महिला सक्षमीकरण वर कार्य करून समतेचे राज्य घडवले. सर्व जाति-धर्माच्या मुलांकरीता व मुलींकरिता शिक्षण देणाऱ्या शाळा काढल्या. शिष्यवृत्ती ची शुरूवात केली आणि मोफत शिक्षणा चा कायदा केला. 

      कार्यक्रमला महाविद्यालयचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.