शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
आई वडीलांचे मनाशी बाळगलेले स्वप्न साकार व्हावे यासाठी प्रियंका गायकवाड ही सतत दिवसरात्र धडपडतेय! सध्या ती स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा ह्या गावापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शेगांव खुर्द या गावची ती मुळ रहिवाशी!
घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम !
कुटुंबात आईवडील बहिन व भाऊ! बालपणापासून तीला शिक्षणाची आवड व गोडी! प्राथमिक शिक्षण मुळ गावी केल्या नंतर तिचे पुढील शिक्षण बाहेर गावी झाले याचं शिक्षणातून ती आज इलेक्ट्रिकल इंजिनिअर झाली.
येथेच तिचा प्रवास थांबला नाही.तर तीने थेट चंद्रपूर गाठले स्थानिक तुकुम परिसरात किरायाची रुम बघितली आणि
स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली एक वर्षाचा कालावधी झाला जोमाने ती या परीक्षेचा अभ्यास दिवसरात्र करीत आहे.महागडे पुस्तके परिस्थिती अभावी घेवू न शकल्यामुळे ती आजही उन्हाळा पावसाळा हिवाळा या तीनही ऋतुत सकाळी दहा वाजता तीन किलोमीटरचा प्रवास सायकलने करीत एका ग्रंथालयात जात आहे.
पूर्ण दिवस मावळल्यानंतर ती परत आपल्या रुम कडे परतेय!
हा नित्यक्रम गेल्या एक वर्षापासून तिचा सातत्याने सुरू आहे.अतिशय शांत स्वभावाची प्रियंका ही महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे यांची ती मानस कन्या आहेत.तर किरण साळवी व रंज्जू मोडक यांची ती आवडती व जवळची आहे.आपल्या गोड स्वभावातून तिने अनेकांशी घनिष्ठ व आपुलकीचे संबंध निर्माण केले आहे.आज ती महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपची एक सदस्य आहे.भविष्यात पत्रकारितेचा अभ्यासक्रम करण्याचा तिचा मानस आहे.
मनात जिद्द ,चिकाटी व परिश्रम घेण्याची क्षमता ठेवणा-या या प्रियंकाला गत वर्षी मूल नगरीत लोकहितच्या वतीने पत्रकार भवनात पार पडलेल्या एका महिला सन्मान पुरस्कार समारंभात अनेक मान्यवर मंडळींत सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
या समारंभाला खूद्द महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा धोटे ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या.याच कार्यक्रमात तिला महिला सन्मान पुरस्कार बहाल झाल्याबद्दल कोसंबीच्या समाजसेविका चंदाताई कामडी ,सहज सुचलंच्या मुख्य सहसंयोजिका नलिनी आडपवार , व अर्चना दत्तात्रय समर्थ यांनी तिचे तोंड भरून कौतुक करीत अभिनंदन केले होते.
गेल्या काही दिवसांपूर्वी याच प्रियंकाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नेतृत्व करीत तत्कालीन राज्यपाल यांच्यासह दिल्लीत अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या हे सर्वश्रूतच आहे.
ती कुटुंबात सर्वाधिक आईची लाडकी आहे.नित्य तिच्या साठी तिच्या आईचा फोन रात्री सतत खणखणत असतोय! कितीही कामात व्यस्त असली तरी काळजी करणा-या आईंशी बोलण्यासाठी प्रियंका कधीच टाळत नाही.
मायाताई कोसरे ,मेघाताई धोटे ,रंज्जू मोडक यांच्या शब्दांचा ती नेहमीच आदर करतेय.
भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष कु.किरण साळवी यांची ती जीवलग मैत्रिण आहे.
परिस्थितीवर मात करीत यशाचा उत्तुंग शिखर गाठण्यांच प्रियंकाचे एक स्वप्न आहे.


