भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील मोडेभट्टी( तुलावी टोला) येथे अवैधरित्या सुरू असलेल्या कोंबडा बाजारावर पोलिसांनी 22 जून रोजी धाड टाकून नव आरोपींना अटक केली तसेच कोंबडे व सात दुचाकी एक चार चाकी गाडी जप्त करण्यात आले
धानोरा पोलीस जवान मोहली परिसरात ग्रस्त घालीत असताना गुप्त माहिती मिळाली की मोडे भट्टी येथील जंगल परिसरातील पहाडी जवळ कोंबड्याच्या झुंजीवर पैशाच्या जुगाराचा खेळ खेळला जात असल्याचे माहित होताच ताबडतोब पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तेथे कोंबड्याच्या झुंजीवर पैशाचा जुगाराचा खेळ सुरू असल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी त्वरित झाड टाकून मनोज भैसारे राहणार थोटेबोडी विजय देशमुख राहणार रांगी महेश वाते राहणार खार्डी जमीर शेख राहणार गोकुळ नगर संदीप मेश्राम राहणार रांगी सारंग सेलोटे राहणार मरेगाव निरंजन राऊत राहणार थोटे बॉडी सचिन राहणार खुरसा शिवा सिंह राहणार गडचिरोली असे एकूण नऊ जनासह एक चार चाकी वाहन सात दुचाकी वाहन व सहा नग कोंबडे एकूण किंमत आठ लाख 67 हजार 160 रुपयाचे मुद्देमाल जप्त करण्यात आले सदर आरोपीवर महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला या धाडसत्रामुळे अवैधरित्या कोंबडा बाजार भरणाऱ्या चे धाबे दणाणले आहेत.
सदर कारवाई धानोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुमित चेवले पोलीस हवालदार भजन गावडे पोलीस हवालदार जनेरसिंग उसेंडी पोलीस शिपाई मनोज दुगा प्रवीण राऊत चंद्रशेखर मैंद प्रवीण गौड विनायक मळावी मोरेश्वर पोटावी पुरुषोत्तम येलमुले अमित यांनी पार पाडली


