बाळासाहेब सुतार
निरा नरशिहपुर प्रतिनिधी
जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित,विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मधील 53 विद्यार्थ्यांनी सीईटी, जेइइ, नीट परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले, यशस्वी विद्यार्थ्यांचे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन दिनांक 21 जून 2025 रोजी करण्यात आले.
त्यामध्ये सीईटी परीक्षेमध्ये 95 % पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 10,000 स्कॉलरशिप म्हणून देण्यात आली.
तसेच JEE, NEET परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री.गणेश पवार सर यांनी केले.
गुणगौरव समारंभाच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे आधारस्तंभ माननीय श्री. दिलीप ढोले (सिडको सह व्यवस्थापकीय संचालक) उपस्थित होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, भविष्यात लाखेवाडी या गावची ओळख Education Hub म्हणून होईल असा आशावाद व्यक्त केला.यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.श्रीमंत ढोले यांनी जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संस्थेच्या विकास आराखड्याबाबत थोडक्यात आढावा सांगितला तसेच इंदापूर तालुक्यात प्रथम AI व ML इंजिनिअरिंग कॉलेजची सुरुवात लाखेवाडी मध्ये झाली आहे.याबद्दलही माहिती दिली.
विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमासाठी जय भवानी गड विकास प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीमंत ढोले, सिडको सह व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप ढोले, सचिव श्री. हर्षवर्धन खाडे, उपाध्यक्ष सौ. चित्रलेखा ढोले, मुख्य सल्लागार श्री. प्रदीप गुरव, संस्थेचे विश्वस्त श्री. पृथ्वीराज ढोले, चि. ऋषिकेश ढोले,विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. गणेश पवार, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री. राजेंद्र सरगर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य श्री सम्राट खेडकर,पालक, विद्यार्थी उपस्थित होते.



