Home देशविदेश अनेक वकीलांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल,”वकील फरार?… — विनोद...

अनेक वकीलांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल,”वकील फरार?… — विनोद खोब्रागडे यांचा अपमान करीत त्यांना अश्लिल व जातीवाचक शब्दात धमकी देणे पडले महागात…

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

      कोर्ट विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश चंद्रपूर यांच्या न्यायालयातंर्गत कोर्ट रुममध्येच विनोद खोब्रागडे यांना अश्लिल व जातीवाचक शिविगाळ करीत जिवंत मारण्याची धमकी काही वकीलांनी दिली होती.

      याचबरोबर शांतता भंग करीत सार्वजनिक ठिकाणी विनोद खोब्रागडे यांना अनेक वकीलांनी अपमानित केले होते.हे सर्व साक्षदार यांच्या समक्ष पब्लिक प्लेस मध्ये वकील मंडळी यांनी गुन्हा केला होता.

          यामुळे त्यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.या कारवाई मुळे चंद्रपूर येथील वकील मंडळींना कायदा काय असतो हे उमजले असून त्यांच्यात कायद्याचा जबर धाक निर्माण झाला असल्याचे प्रकरण आहे.

      चंद्रपूर कोर्टाचा इतिहासात पहिल्यांदाच अँड.श्रीकांत कवटलवार सह इतर अज्ञानी वकीलांच्या विरुद्ध अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कलमानुसार FIR दाखल झालाय.हे प्रकरण अख्या देशात गांभीर्याने विचार करायला भाग पाडणारे आहे.

      तद्वतच आरोपी वकीलानी,कोर्ट विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश चंद्रपूर यांचा न्यायालयात,”कोर्ट रुममध्येच विनोद खोब्रागडे यांना अश्लिल व जातीवाचक शिवीगाळ करूणे,त्यांना जिवंत मारण्याची धमकी दिणे,कोर्ट रुम मध्ये उपस्थित सर्वांची शांतता भंग करणे,विनोद खोब्रागडे यांचा जाणिवपुर्वक अपमानित करणे,हा घटनाक्रमच भयंकर गंभीर असून डोके ठणकावणारा आहे.

       भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चां कलम २९६,३५२,३५१(२),व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ सुधारणा २०१६ कलम ३(१)(r)३(१)(s) नुसार रामनगर पोलिस स्टेशन चंद्रपूर येथे गुन्हा दाखल झाला आहे.

       यापुर्वी अँड.राजेश जुनारकर यांच्या सह पाच आरोपी विरुद्ध FIR दाखल झालेला आहे.याचबरोबर २०-२५ जेष्ठ विद्वान वकील मंडळी विरुद्ध फौजदारी खटला दाखल केला असून नोटीस इशु झाले आहेत.

       काही वकिल मंडळी, स्वाक्षरी मोहीम राबवीत असून वारंवार मिंटींग,सभा घेत आहेत आणि निवेदने,विनोद खोब्रागडे यांच्या विरुद्ध वरिष्ठांना देऊन दिशाभूल करीत आहेत.

       यामुळे विनोद खोब्रागडे यांना तात्काळ सुरक्षा देन्यात यावी व आत्त्म संरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात यावे अशी मागणी आज पत्रकार परिषदेत त्यांनी केली आहे…