दखल न्यूज भारत विशेष
लहान ग्रामपंचायत अंतर्गत पदाधिकाऱ्यांना त्यांच्या हद्दीतील नागरिकांना योग्य पाणी पुरवठा करण्यासाठी तथा पाणी टंचाईवर मात करण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे केवळ ५ हजार रुपयांच्या अल्प खर्चाची मर्यादा आहे…
तिव्र पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सदर गाव हे पाणी टंचाईग्रस्त गावांच्या यादीत येणे आवश्यक आहे.पाणी टंचाईच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अनेक निकष आहेत.या निकषाला अनुसरून ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांनीही जबाबदारीपुर्वक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सहकार्य करणे,”शासन-प्रशासनाने अपेक्षित केले आहे..
तद्वतच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांबरोबरच गावीतील नागरिकांची जबाबदारी शासनाने निश्चित केली आहे.(ते खालील मुद्द्यांवर मी स्पष्ट करतो आहे.)
ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असलेल्या ग्रामीण भागातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे,ही ग्रामपंचायतची जबाबदारी आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत,प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले जातात.यासाठी,ग्रामपंचायत, तालुका आणि जिल्हा स्तरावर विविध विभागांकडून तांत्रिक मार्गदर्शन आणि कार्यवाही केली जाते.
*****
मी माझ्या गावातील पाणी पुरवठ्याकडे आणि स्वच्छतेकडे लक्ष वेधतो आहे…
सरपंच शंकरसिंह चंदेल,सरपंच हरीजी राऊत,सरपंच सभाजी सुर्यवंशी,सरपंच गो.रायशिडाम,सरपंच ईश्वर पसारे,सरपंच पा.भा.सयाम,सरपंच कवळू समर्थ,परत सरपंच ईश्वर पसारे सरपंच रमेश शेंडे,सरपंच मुक्ताताई कापसे यांचा कार्यकाळ कोटगाव ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी अनुभवला आहे.
याचबरोबर उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांच्याही कार्य शैली कोटगाव हद्दीतल नागरिकांनी बघितलेल्या आहेत.
आतापर्यंतच्या प्रत्येक सरपंच्यांनी,उपसरपंच्यांनी, ग्रामपंचायत सदस्यांनी आपापल्या बुज राखण्यासाठी आपल्या बहुमताच्या बळावर कशाप्रकारे कामे केलीत,हे सुद्धा मौजा कोटगाव,मौजा दाबका हेटी,मौजा वघळपेठ येथील नागरिकांनी बघितले आहे.
कोटगाव,दाबकाहेट्टी, वघळपेठ येथील नागरिकांना स्वच्छ पाण्याच्या व्यवस्थापनासाठी योग्य उपाययोजना प्रत्येक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केल्या असतीलच! त्यांच्या कार्यकाळात संबंधित मंत्रालय आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून निधी उपलब्ध झालेला आहे हे वास्तव आहे.तद्वतच विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध झालेला आहेच!..
स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरी,हातपंप,नळ योजना,यांसारख्या योजना शासनाच्या माध्यमातून मौजा कोटगाव गटग्रामपंचायत अंतर्गत राबविण्यात आल्यात.परंतू या सर्व योजना का म्हणून कुचकामी ठरत आहेत हे सुद्धा कोटगाव,दाबकाहेट्टी व वघळपेठ येथील नागरिकांना माहिती आहे.
याचबरोबर प्रत्येक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात दिवाबत्तींची व्यवस्था,नाल्यांची साफसफाई, निर्जंतुकीकरण पाणी यासाठी काळजीपूर्वक प्रयत्न केले गेले असावेत.यासाठी खर्च शासन निर्णयानुसार व निर्देशानुसार करायचा असतो.हे सुध्दा नागरिकांना माहिती असणे आवश्यक आहे…
विविध सरपंचाच्या कालखंडात आतापर्यंत विकास कामे करण्यासाठी उपलब्ध झालेला निधींची कल्पना कोटगाव हद्दीतल नागरिकांना नाही.कारण काही सरपंचाच्या कार्यकाळातील ग्रामपंचायत रेकार्ड गायब करण्यात आले आहे..
ग्रामपंचायत निवडणूक….
ग्रामपंचायत निवडणूक लढणे हा कोटगाव ग्रामपंचायत अंतर्गत सर्व नागरिकांचा अधिकार आहे आणि पसंतीच्या उमेदवारांना मतदान करणे हे कोटगाव ग्रामपंचायत अंतर्गत मतदारांचे कर्तव्य आहे.
यावर अनाफसनाफ भाष्य करता येत नाही…
*****
जबाबदारी….
ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा आणि स्वच्छतेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.याचबरोबर गावातील पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी,संचालन आणि देखरेखेची जबाबदारी ग्रामपंचायतीची असते.
पण,यासाठी ग्रामपंचायतींना आवश्यक निधी केंद्र शासन व राज्य सरकार उपलब्ध करून देण्यावरचे उचित नियोजन आहे.
याचबरोबर ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक हे,”घर कर आणि इतर कर,वेळेवर भरून ग्रामपंचायतला मदत करतात काय? यावर ग्रामपंचायतीच्या खर्चाचा डोलारा अवलंबून असतो हे सुद्धा नागरिकांनी समजून घेणे आवश्यक आहे….
पाणी गुणवत्ता..
पाणीपुरवठा वितरण करणारी संस्था,पाणी गुणवत्तेसाठी जबाबदार असते हे वास्तव आहे..
स्वच्छता.…
सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याची जबाबदारी देखील ग्रामपंचायतीची असते..परंतू यात अपेक्षित लोकसहभाग ग्रामपंचायतला मिळत नाही असेही लक्षात आले आहे.
समित्या...
पाणीपुरवठा आणि स्वच्छता समिती स्थापन करून,पाणी आणि स्वच्छतेचे नियोजन केले जाते.
परंतू ग्रामीण भागातील नागरिक आपल्या पोटाच्या थडगीकडे प्राधान्याने लक्ष देत असल्याचे पुढे आले आहे.यामुळे पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांच्या माध्यमातून गाव हितासाठी विनामूल्य किंवा लोकहितासाठी उदारमतवादी विचारांनी काम व कर्तव्य पार पाडायला ग्रामीण नागरिक अनास्था दाखवितात असेही निदर्शनास आले आहे.
तक्रार निवारण..
पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी, ग्रामपंचायत स्तरावर यंत्रणा उपलब्ध आहे,असे संकेतस्थळांवर नमूद आहे.पण खर्च करण्याच्या मर्यादा ग्रामपंचायतला असल्याने तिव्र पाणी टंचाईवर ग्रामपंचायत पदाधिकारी हतबल होतात हे वास्तव शासन – प्रशासनालाही माहिती आहे.
जल जीवन मिशन...
या योजनेअंतर्गत,ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणीद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेत,पाण्याची गुणवत्ता, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले जाते.
ग्रामपंचायतीची भूमिका...
पाणीपुरवठा योजनांसाठी अंदाजपत्रके आणि आराखडे तयार करणे,पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी करणे,पाणीपुरवठा योजनेच्या कामांची नियमित तपासणी करणे,पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीची व्यवस्था करणे,पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे निवारण करणे…
पाणी टंचाईग्रस्त गावांसाठी उपाययोजनांमध्ये पाणी वाचवणे,जलस्रोतांचे व्यवस्थापन करणे,आणि पाण्याच्या वापराच्या पद्धतींमध्ये बदल करणे यांचा समावेश होतो.
भूजल पुनर्भरण,जलस्रोतांचे संवर्धन,आणि पर्ज्यनजल व्यवस्थापन यासारख्या उपायांमुळे पाणी टंचाईवर मात करता येते.
*****
पाणी टंचाईग्रस्त गावांसाठी उपाययोजना…..
1. पाणी वाचवणे आणि पाण्याचा पुनर्वापर…
सांडपाणी प्रक्रिया करून ते शेतीसाठी किंवा इतर कामांसाठी वापरणे.
पाण्याची बचत तथा पाण्याची गरज कमी करण्यासाठी कमी पाण्यात होणारे पीक घेणे,पाण्याची गळती थांबवणे,आणि पाण्याची बचत करणारे उपकरणे वापरणे.पाण्याची कार्यक्षमतेने वापर: सिंचनासाठी ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनाचा वापर करणे.
2. जलस्रोतांचे व्यवस्थापन आणि भूजल पुनर्भरण…
पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी उपाययोजना करणे,जसे की रेन हार्वेस्टिंग आणि रिचार्ज पिट्स…
जलसंधारण तलाव,बंधारे आणि इतर जलसाठे तयार करणे आणि त्यांची देखभाल करणे.नदी आणि नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करणे हे पावसाचे पाणी साठवण्यासाठी आणि जमिनीत मुरवण्यासाठी आवश्यक आहे.
3. पाण्याच्या वापराच्या पद्धतींमध्ये बदल तथा शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन…
कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची लागवड करणे आणि पाण्याची बचत करण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर करणे.
औद्योगिक आणि शहरी भागांसाठी पाण्याची पुर्नवापर योजना राबवणे आणि पाण्याची मागणी कमी करणे.
4. पाणी व्यवस्थापनासाठी जनजागृती आणि समुदायाचा सहभाग..
पाणी व्यवस्थापनात लोकांना सहभागी करणे आणि त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे.
शिक्षण आणि प्रशिक्षण..
पाणी वाचवण्याचे महत्व लोकांना समजावून सांगणे आणि त्यांना योग्य प्रशिक्षण देणे.
5. सरकारी योजनांचा लाभ आणि जल जीवन मिशन…
सदर केंद्र सरकारची योजना आहे,ज्यामध्ये ग्रामीण भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते.
इतर योजना...
राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांचा लाभ घेऊन पाणी टंचाईवर मात करता येते.
6. आपत्कालीन उपाययोजना…
टँकरद्वारे पाणीपुरवठा,तीव्र पाणी टंचाईच्या काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे.
जलकुंभांची व्यवस्था…
गावांसाठी जलकुंभ तयार करणे,जेणेकरून लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल.
7. दीर्घकालीन उपाययोजना…
पाण्याची उपलब्धता आणि मागणीचा अभ्यास करून दीर्घकालीन पाणी योजना तयार करणे.
पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन..
पावसाचे पाणी साठवण्यासाठी आणि जमिनीत मुरवण्यासाठी उपाययोजना करणे.
8. प्रशासन आणि नियोजन…
पाणी टंचाई कृती आराखडा तयार करणे,पाणी टंचाईग्रस्त गावांची ओळख पटवून उपाययोजना करणे,पाणी व्यवस्थापनासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे.
9. समुदायाचा सहभाग आणि लोकसहभाग..
पाणी व्यवस्थापन समित्या – पाणी व्यवस्थापनासाठी समित्या स्थापन करणे आणि त्यात स्थानिक लोकांचा सहभाग घेणे.
जनजागृती मोहीम…
पाणी वाचवण्याचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवणे…
10. तंत्रज्ञानाचा वापर..
सॅटेलाइट इमेजिंग आणि डेटा ॲनालिटिक्स,पाणी टंचाईचा अंदाज घेण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे.
स्मार्ट वॉटर मीटर…
पाण्याची चोरी आणि गळती थांबवण्यासाठी स्मार्ट वॉटर मीटरचा वापर करणे.
तीव्र पाणी टंचाई आणि ग्रामपंचायत यांच्यातील संबंध हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने पाण्याच्या व्यवस्थापनात त्यांची भूमिका महत्त्वाची असते.
पाणी टंचाईच्या काळात,ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणे,पाणी जपून वापरण्याचे नियोजन करणे आणि पाणी व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
पाणी व्यवस्थापनात ग्रामपंचायतीची भूमिका…
१) पाणीपुरवठा योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणी करणे.
२) पाण्याची बचत करण्यासाठी जनजागृती करणे.
पाणी टंचाईच्या काळात पाणी जपून वापरण्याचे आवाहन करणे.
३) पाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेले नियम आणि कायदे करणे.
४) पाण्याच्या स्त्रोतांचे संरक्षण करणे.
पाणी टंचाईचे दुष्परिणाम…
पिण्याच्या पाण्याची कमतरता,शेतीसाठी पाण्याची कमतरता,आरोग्याच्या समस्या,आर्थिक नुकसान..
ग्रामपंचायतीने काय करावे?...
पाणी व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन करणे,पाणी जपून वापरण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे,पाण्याच्या स्त्रोतांचे संरक्षण करणे,पाणी टंचाईच्या काळात लोकांना आवश्यक ती मदत करणे,जलसंधारणाचे काम करणे होय..



