Home Maharashtra चिमूर तालुक्यातील अनेक गावे तीन दिवसापासून काळोखात… — संबंधित यंत्रणा हतबल...

चिमूर तालुक्यातील अनेक गावे तीन दिवसापासून काळोखात… — संबंधित यंत्रणा हतबल का म्हणून आहे?

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

        नैसर्गिक आपत्तीपुढे सगळ्यांना नमावे लागतय हा अनुभव सर्वांनाच आहे.परंतू निसर्गाच्या अवकृपा नंतर विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रित करून काळोखात असलेल्या गावातील नागरिकांना खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करुन दिलासा देण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे या मताचे विज ग्राहक आहेत.

         चिमूर पासुन सात किलोमिटर अंतरावर असलेल्या तळोधी नाईक,कीटाळी तूकूम,टेकेपार,अलिझंझा,खापरी येथील नागरिक आपल्या चिमुकल्या बाळासह तीन दिवसापासून अंधारात राहात आहेत.

            विद्युत विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे व निकृष्ट साहित्याचा वापार करण्यात येत असल्यामुळे संपूर्ण गावे ही अंधारात आहेत.विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आमचे प्रयत्न सुरू आहेत असे नेहमीचे उत्तर आहे.

      निसर्गाच्या प्रकोपामुळे काही ठिकाणी विद्युत खांब पडले तर विद्युत तार खराब झाली होती.परंतु तीन दिवसापासून याकडे विज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने या परिसरातील संपूर्ण गावकऱ्यांना अंधारात ठेवण्याचे कटकारस्थान हा विद्युत विभाग करीत आहे काय? असा प्रश्न निर्माण होतो आहे.

       यांच्या या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना अनेकदा अंधारात ठेवणारे प्रकरण या परिसरात सातत्याने घडत आहेत.

        ही संपूर्ण गावे वनविभागाच्या बफर झोन क्षेत्रात येत असतात.त्यामुळे वनातील हिस्त्र प्राणी यांचा नेहमी वावर या परिसरात होत आहे.यापूर्वी वाघाने हल्ला चढवून काही इसम मारलेले आहे. 

        ही सर्व जाणीव असून सुद्धा या परिसरातील विद्युत पुरवठा नियमित करण्यासाठी दुर्लक्ष केले जाते.सदर गावांना मासळ इथून विद्युत पुरवठा केला जातो आणि तो नेहमी खंडित पुरवठा केला जातो.

      या परिसरात नेहमी लाईट जाणे नित्याचीच बाब झालेली आहे.यामुळे तांत्रिक युगामध्ये अनेक बाबी वरती परिणाम झालेला आहे.यात पाणीपुरवठा योजना योग्य त्या पद्धतीने चालवता येत नाही.आटा चक्की,घरगुती उपकरणे असे अनेक बाबी प्रभावीत झालेल्या आहे.

       तीन दिवसापासून लाईट नसल्यामुळे काहीचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे.लहान लहान बालकांचे हाल होत आहेत.थोडा पाऊस झाल्यामुळे उष्णतेमध्ये वाढ झालेली आहे.यामुळे लहान मुलांची चिडचिडपणा वाढलेली आहे.या परिसरातील संपूर्ण नागरिक त्रस्त आहेत.

        तळोधी नाईक गाव हे संवेदनशील गांव आहे,भारतीय इतिहासात स्वातंत्र्य करिता विशेष ओळख आहे.अशा ऐतिहासिक गावाला विद्युत पुरवठा न होणे ही एक खेदाची बाब आहे.

         परिसरातील जनतेची मागणी आहे की तळोधी परिसरातील गावांना विशेष बाब म्हणून विद्युत विभागाने अखंडित विद्युत पुरवठा करावा,जेणेकरून नागरिकांना कोणताही परिणाम भोगावा लागणार नाही.

       विद्युत विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तळोधी परिसरातील सर्व गावांचा आढावा घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी परिसरातील जनतेची मागणी आहे.