Home Maharashtra “सन्मान द्या आणि सन्मान घ्या,या सामाजिक उपक्रमांतर्गत पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवस...

“सन्मान द्या आणि सन्मान घ्या,या सामाजिक उपक्रमांतर्गत पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवस विविध कार्यक्रमांनी थाटात संपन्न…. — अनेक मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार झालाय सन्मानपूर्वक!..

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक

दखल न्यूज भारत..

   — पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय ऑफलाईन स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थी सत्कार,रक्तदान शिबिर,मोफत नेत्र तपासणी व विविध सामाजिक क्षेत्रातील 76 कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न… 

— माजी खासदार खुशाल बोपचे,मुख्य संपादक दैनिक माझा मराठवाडा दशरथ सुरडकर,जटा टीव्ही चे मुख्य संपादक निखिलेश कांबळे ,सरपंच शिवशंकर मुंगाटे आवर्जून उपस्थित… 

  भंडारा – दिनांक 9 जून 2025 ला प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व विदर्भ विभागीय दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे संपादक ,जनता टाईम/ जटा टीव्ही चे प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचे औचित साधून,”सन्मान द्या व सन्मान घ्या,या सामाजिक उपक्रमांतर्गत जे विविध सामाजिक क्षेत्रात काम करतात व त्यांच्या कार्याची दखल कुठेतरी व्हावी व त्यांच्या कार्याचा मान सन्मान व्हावा या उदात्त हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

      वाढदिवस हे फक्त नाममात्र निमित्त होते.परंतु तळागाळातील कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे करण्यात आले होते.

      यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांचे उपस्थितीत महाकारूणी तथागत गौतम बुद्ध,बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले,आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज,यांना सर्वप्रथम अभिवादन करण्यात आले.

        त्यानंतर सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी प्रबोधनकार भावेश कोटांगले यांनी पत्रकार संजीव भांबोरे यांच्यावर आधारित गीत सादर केले.

        त्यानंतर ४ वाजता राज्यस्तरीय घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम अंकित वसंता लोंदासे,द्वितीय दुर्गेश विलास लोंदासे,तृतीय सुमेध खुशाल खोपे,विद्यार्थ्यांचा अनुक्रमे 1001,701 ,501,रुपये श,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र ,पुष्पगुच्छ व मानाचा फेटा बांधून मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

         त्याचप्रमाणे सत्कारमूर्ती पत्रकार संजीव भांबोरे यांचा दैनिक माझा मराठवाडा चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांनी भव्य दिव्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला.जनता टाईम /जटा टीवी चे मुख्य संपादक निखिलेश कांबळे यांनी भव्यदिव्य तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

      सरपंच शिवशंकर मुंगाटे यांनी शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.प्रेस संपादक पत्रकार सेवा संघटनेचे भंडारा जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे,व भंडारा जिल्हा प्रभारी डॉ.अक्षय कहालकर,उपाध्यक्ष सुरज गोंडाने,पत्रकार ऋग्वेद येवले यांच्या वतीने सन्मानचिन्ह,गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.अभय रंगारी सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने सुद्धा पुष्पगुच्छ सन्मानपत्र,सन्मान चिन्ह,देऊन सत्कार करण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते सदानंद धारगावे यांनी सुद्धा सन्मानचिन्ह,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.तिरुपती गिफ्ट एम्पोरियम भंडारा यांनी सुद्धा सन्मानचिन्ह, शपुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.

      त्याचप्रमाणे विविध सामाजिक क्षेत्रातील कवी,लेखक,साहित्यिक, पत्रकार,प्रबोधनकार, डॉक्टर ,सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मानचिन्ह,सन्मान प्रमाणपत्र,मानाचा फेटा व पुष्पगुच्छ देऊन व भारताचे संविधान देत मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

           त्यात प्रामुख्याने माजी खासदार खुशाल बोपचे,दैनिक माझा मराठवाडा विभागीय संपादक दसरथ सुरडकर,मराठवाडा विभागीय संपादक गोकुळ सिंग राजपूत,कार्यकारी संपादक संजय दांडगे,परशुराम दिघोरे,प्राध्यापक राजेश नंदपुरे, शंकर भेंडारकर,विजयकुमार डहाट,सदानंद धारगावे ,अमरकंठ समरीत,अभय रंगारी,रोशन जांभुळकर,लोकनाथ रायपुरे, पंकज वानखेडे,डॉ.अक्षय कहालकर ,गणेश पारधी,जीवन बोधी बौद्ध,डॉ.गणेश मेश्राम,प्राध्यापक अशोक वाहने,सरपंच शिवशंकर मुंगाटे,पत्रकार आशिष चेंडगे,प्रबोधनकार भावेश कोटांगले,प्राध्यापक राहुल डोंगरे,पत्रकार ऋग्वेद येवले,भीमराव टेंभुर्णे,मनोज चिचगरे,विजय नंदागवळी,सतीश सोमकुवर,सुनील सूर्यवंशी, कुलदीप गंधे,कवी नाशिक चवरे,पत्रकार शशिकांत भोयर,विलास बांडेबुचे, गुलाब घोडसे, अर्पित मेश्राम ,विनय ढोके ,विकास टेंभुर्णे ,अमोल थुलकर ,सोहेल खान , मुनेश्वर बोदलकर ,प्रेमसागर गजभिये ,विजय खोब्रागडे, अशा विविध सामाजिक क्षेत्रातील 76 कार्यकर्त्यांचा माजी खासदार तथा अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष खुशाल बोपचे,दैनिक माझा मराठवाड्याचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर,जनता टाईम/जटा टीव्ही चे मुख्य संपादक निखिलेश कांबळे,अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे,संविधान संघर्ष समिती चे भंडारा जिल्हा अध्यक्ष रोशन जांभुळकर,साहित्यिक अमृत बनसोड,शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध ,सत्कारमूर्ती प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व विदर्भ विभागीय दैनिक माझा मराठवाडा संपादक,त्याचप्रमाणे जनता टाईम /जनता टीव्हीचे प्रतिनिधी संजीव भांबोरे,दैनिक माझा मराठवाडा कार्यकारी संपादक संजय दांडगे,दैनिक माझा मराठवाडा विभागीय संपादक गोकुळ सिंग राजपूत,यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले.

         यावेळी वाढदिवसानिमित्त समर्पण ब्लड बँक भंडारा यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे नेत्रसेवा हॉस्पिटल भंडारा यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला महिला व युवक यांनी सहकार्य करून आपला सहभाग नोंदविला.

      त्याचप्रमाणे राज्यस्तरीय ऑफलाइन स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना सन्मान प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

       त्याचं प्रमाणे सर्व सत्कार मूर्तींना जेवणाची सुद्धा सुविधा करण्यात आली होती.आपलाही स्पर्धेत कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक राजेश नंदपुरे यांनी केले तर सर्व मान्यवरांचे आभार प्रबोधनकार भावे कोटांगले यांनी मानले.

        रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरता अर्पित मेश्राम व संदीप नवले यांच्या टीमने उत्कृष्ट सहकार्य केले.त्याचप्रमाणे पंकज वानखेडे,आशिष मेश्राम ,प्रमोद वासनिक, अंबादास मेश्राम यांनी मोलाचे सहकार्य केले.