Home Social आंबोली येथे नवदाम्पत्याच्या हस्ते वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी…

आंबोली येथे नवदाम्पत्याच्या हस्ते वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी

  चिमूर:- चिमूर तालुकातंर्गत मौजा आंबोली येते नवदाम्पत्याच्या हस्ते वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी व नवनवीन उपक्रम राबविण्यात पूढाकार घेणाऱ्या ग्राम पंचायत आंबोलीने यंदाची वटपौर्णिमा वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचे ठरवले व यंदा नव्याने लग्न झालेल्या गावातील नवं दांपत्याच्या हस्ते वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.

      भारतीय परंपरा जोपासण्यासोबतच पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या संकल्प नव दाम्पत्यांकडून करण्यात आला.आणि ग्राम पंचायत आंबोली कडून दरवर्षी गावातील नवदाम्पत्यालांकडून वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी करण्याचे ठरवले. 

       यावेळी ग्राम पंचायत पदाधिकारी नवदाम्पत्य वैभव ठाकरे, अंचल जांभुळे,गोलू ढोक व महिलामंडळी उपस्थित होते.

      प्रत्येक ग्राम पंचायतने असा पुढाकार घेऊन वटपौर्णिमा निमित्ताने झाडे लावावे व भारतीय परंपरा जोपासण्यासोबतच पर्यावरण रक्षणाचे महान कार्य करावे.

शितल वैभव ठाकरे