Home Maharashtra आठ महिन्यापासून थकलेले निराधारांचे निवृत्ती वेतन त्वरित द्या. :- सरपंच प्रीती दीडमुठे…...

आठ महिन्यापासून थकलेले निराधारांचे निवृत्ती वेतन त्वरित द्या. :- सरपंच प्रीती दीडमुठे… — चिमूर तहसीलदारांना निवेदन..

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

चिमूर:- चिमूर तालुकातंर्गत संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजना,वृद्धापकाळ योजना आणि अपंगांचे निवृत्तीवेतन मागील आठ महिन्यापासून थकीत असल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे.

     त्यामुळे त्यांचे निवृत्ती वेतन त्यांच्या बँक अकाऊंटला तात्काळ जमा करण्यात यावे,अशी मागणी साठगाव येथील उपसरपंच प्रीतीताई दीडमुठे यांनी केली आहे.            

      तात्कालीन केंद्र सरकार द्वारे अपंग,निराधार,वृद्ध,लोकांचे जीवन सुखमय व्हावे,त्यांचा प्रपंच सुखकर व्हावा,त्यांना त्रास होऊ नये यासाठी या योजना बऱ्याच वर्षापासून अमलात आणल्या आहेत. 

       परंतु मागील आठ महिन्यापासून या योजनेची रक्कम लाभार्थ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना सध्या हलाकीचे जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणी योजने करिता बाकी सर्व जुन्या योजनांना कात्री लावली की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

             सदर लाभार्थी दर महिन्याला बँकेत जाऊन खात्यावर योजनेचे पैसे जमा झाल्याची तपासणी करत आहेत.परंतु त्यांना घोर निराशाच हाती येत आहे.शासनाच्या वतीने अजूनही या लाभार्थ्यांना निवृत्तीवेतन मिळालेली नाही.

       एकीकडे शासन लाडक्या बहिणीला खुश करण्यासाठी दर महिन्याला पंधराशे रुपये जमा करत आहे.पण कितीतरी वर्षापासून सुरू असलेल्या जुन्या योजनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. 

      या वृद्ध निराधार लोकांना चालू असलेले निवृत्तीवेतन आठ महिने होऊनही मिळालेले नाही.त्यामुळे साठगाव येथील जवळपास 52 लाभार्थ्यांना मागील आठ महिन्यापासून निवृत्ती वेतन मिळालेली नाही.त्यांना निवृत्तीवेतन मिळण्यात यावे यासाठी साठगाव येथील उपसरपंच प्रीतीताई दिडमुठे यांच्या नेतृत्वात 52 महिलांनी तहसीलदार चिमूर यांना निवृत्तीवेतन मिळण्यासाठी निवेदन सादर केले असून या महिन्यात या लाभार्थ्यांना निवृत्तीवेतन मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.