Home देशविदेश विचार,भावना,कृती.

विचार,भावना,कृती.

     मानवी शरीरातील डोक्यात मेंदू असतो,त्या मेंदूच्या डाव्या बाजूच्या ग्रंथीमधून जे स्त्राव निर्माण होतात त्या स्त्रावातुन विचार निर्माण होतात आणि मेंदूच्या डाव्या बाजूतून जे स्त्राव निर्माण होतात त्यात भावना असतात.म्हणजेच मेंदूचा उजवा भाग म्हणजे भावनेचा म्हणजेच भावनाशील भाग होय,आणि मेंदूचा डावाभाग म्हणजे विचाराचा म्हणजे विचार करणारा भाग होय.याचा अर्थ मेंदूचे दोन भाग 1.विचार करणारा डावा भाग आणि भावनेचा उजवा भाग.एक विचारशील तर दुसरा भावनाशील.म्हणजेच डावा विचारशील आणि उजवा भावनाशील.म्हणजेच डावेविचारशील आणि उजवे भावनाशील.असा अर्थ होतो.हे मानसशास्त्रातील मांडणी आहे.

      विचार आणि भावना या एकत्रित कार्य करतात.विचारला भावनेची जोड मिळते म्हणूनच त्यातून कृती घडते,म्हणजे कार्य घडते,काहीतरी निर्मिती होते.विचाराची अभिव्यक्ती होते.म्हणजे विचार मुखावाटे बाहेर पडतात.आणि त्यातून कार्य कृती घडते.याचा क्रम असा लावता येईल,1 आधी विचार मग त्याला भावनेची जोड . 2 यामुळे अभिव्यक्ती.3 अभिव्यक्तीमुळे कृती आणि कृतीतून कार्य.

      कार्य हे दोन प्रकारचे असते .1 दृश्यस्वरूप .2 अदृश्यस्वरूप.

दृश्यस्वरूप कार्य म्हणजे वस्तू आणि वास्तू निर्मिती.दृश्यस्वरूप कार्य म्हणजे उदा.धर्म,संस्था,सरकार,लोकशाही हे सर्व अदृश्य कार्य आहेत.कायदे हे दृश्यच असतात.म्हणजे हे डोळ्याला दिसत नाहीत,पण कृतीत असतात.यांचे कार्य असते.यांचे कृतीतील कार्य म्हणजे कार्यालये,कर्मचारी,कार्यकर्ते,धर्माची पूजा अर्चा,

    एकाच वेळी अभिव्यक्तीचे अजून एक उदाहरण देता येईल.उदा.ईश्वर .हा विचारात असतो, तो अभिव्यक्त करायचा झाला तर त्याची मूर्ती घडवावी लागते.म्हणजे विचाराची ही कृती होय.अजून एक उदाहरण म्हणजे चित्रकार किंवा शिल्पकार हा आधी त्या चित्राची किंवा मूर्तीची कल्पना करतो आणि त्यानुसार ती कल्पना किंवा विचार म्हणजेच आधी विचार त्याला कल्पनेची म्हणजे भावनेची जोड आणि ही जोड कृतीत उतरविणे म्हणजेच ती मूर्ती किंवा घर,किंवा एखादे स्मारक निर्मिती होय.

        म्हणजे या मानवी मेंदूतून आधी विचार निर्माण होतात,त्याला भावना जोडल्या जाते,त्यामुळे विचाराची अभिव्यक्ती होते.ही अभिव्यक्ती मुख डोळे हात पाय अंग विक्षेप यातून दृश्यस्वरूपात अथवा अदृश्य स्वरूपात व्यक्त होत असते.

    आता मेंदूतील डाव्या असो की उजव्या भागातील ग्रंथीतून स्त्राव का आणि कसा निर्माण होतो ? हे पण पाहिले पाहिजे.याचे उत्तर पण मानस शास्त्रात सापडते. शास्त्र असे सांगते की,हे स्राव निर्मितीचे कारण भौतिक आणि मानसिक आहे.भौतिक कारण असे की,माणूस ज्या वातावरणात असतो त्याचा परिणाम होतो,जसे की ऋतुमानानुसार किंवा वातावरण थंड गरम समशीतोष्ण यातून त्याची प्रकृती तयार होते,घडते.त्यानुसार त्याच्या ग्रंथीत स्राव निर्माण होतात,त्यानुसार त्याच्या भावना व विचार बनतात.त्यानुसार स्वभाव बनतो,जसे की,रागीट,शांत,समतोल.विचार पण असेच अस्थिर स्थिर समतोल.यातून हे सिद्ध होते की माणसाची भौगोलिक वातावरण,भौतिक परिस्थिती,भौतिक समाज म्हणजे जातीचा धर्माचा समाज,कुटुंब,शेजारी,गल्ली, गाव,शहर,देशाची व्यवस्था आणि ,अवस्था परिस्थिती,गरीबी मध्यम श्रीमंती चे जीवन आई वडील गुरु शिक्षक शाळा अभ्यासक्रम यांच्या द्वारे मिळणारे शिक्षण,मित्रांची संगत,नातेवाईकांचा उपदेश सल्ला ,जीवनातील बरेवाईट अनुभव,भयावह किंवा निर्भय वातावरण , माणसावर होणारे अन्याय अत्याचार या सर्व भौतिक गोष्टींचा माणसावर परिणाम होऊन मेंदूत जसा परिणाम तसा स्त्राव निर्माण होतो,तशा भावना,तसे विचार निर्माण होतात.अशा परिस्थितील विचार आणि भावना माणूस व्यक्त करतो,बोलून दाखवतो किंवा कृती करतो.म्हणून मूळ आहे भौतिक परिस्थिती.त्यात जसे बदल करू तसे मानसिक परिणाम घडतील.परत मानसिकतेतून भौतिक कृती कार्य घडेल.

     सारांश व्यवस्था बदला म्हणजे विचार बदलतील,विचार बदलले की व्यवस्था बदलेल.जसे विचार तसे आचरण .आणि जशी भौतिक परिस्थिती तसे विचार घडतात.

       म्हणजेच असा क्रम लावता येईल,भौतिकतेतून मानसिक,मानसिकतेतून बौद्धिक, बौद्धिकतेथून अभिव्यक्ती,अभिव्यक्तीतून कृती,कृतीतून कार्य,कार्यातून भौतिक व्यवस्था निर्मिती.

        लेखक : दत्ता तुमवाड

          सत्यशोधक समाज नांदेड

   दिनांक: 4 जून 2025.फोन: 9420912209.