Home देशविदेश भांडवलवादी,समाजवादी,साम्यवादी…

भांडवलवादी,समाजवादी,साम्यवादी…

        भांडवलवाद,समाजवाद आणि साम्यवाद हे विचार आहेत आणि व्यवस्था पण आहे.भांडवलवादी विचारांची माणसे,भांडवलवादी सरकार,भांडवलवादी देश आहेत.तसेच समाजवादी विचारांचे व्यक्ती ,सरकारे आणि देश पण आहेत,तसेच साम्यवादी विचारांची माणसे,सरकारे आणि देश आहेत.म्हणजेच या जगात कमी जास्त प्रमाणात का होईना पण भांडवलवादी व्यवस्था,समाजवादी व्यवस्था आणि साम्यवादी व्यवस्था म्हणजे रचना अस्तित्वात आहे.हे वाचकांनी लक्षात घेतले पाहिजे.

      आता आपण भांडवलवादी ,समाजवादी ,साम्यवादी म्हणजे काय ? हे पाहू.

    मी आधीच सांगितले आहे की,हे तीन विचार आहेत,हे तीन आचार आहेत,म्हणजेच व्यवस्था आहे.व्यवहार आहेत.

    भांडवल म्हणजे भौतिक वस्तू,भौतिक गोष्टी की ज्यांना मिळतील ते सुखी जीवन जगतात,आणि ज्यांना कमी अधिक प्रमाणात मिळतील त्यानुसार कमी अधिक सुख मिळते.उदा.पैसा,धन संपती,सत्ता ,प्रतिष्ठा,वैगेरे. ज्याचेतून सुख दुःखाचा अनुभव येतो.अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या माणसाच्या मूलभूत गरजांची पूर्ती ही त्या व्यक्तीकडे असलेल्या भांडवलावर अवलंबून असते.भांडवल म्हणजे पूंजी.ज्याच्याकडे गरजेपेक्षा जास्त भांडवल असते,त्यास पूंजीपती,भांडवलदार,सावकार,श्रीमंत ,मालक असे म्हणतात.ज्यांच्याकडे आपला संसार व्यवस्थित होईल एव्हढे भांडवल ( पूंजी ) असते,त्यास मध्यमवर्गीय माणूस म्हणतात,आणि ज्याच्याकडे अन्न वस्त्र निवारा शिक्षण या प्राथमिक गरजा भागविण्या एवढेही भांडवल पूंजी नसते,पैसा,धन,संपती नसते अशा व्यक्तींना किंवा समूहास गरीब वर्गीय म्हणतात.

       भांडवलवादी विचाराचा माणूस स्वार्थी असतो,स्वार्थी तर सगळेच असतात,पण हे अधिकच स्वार्थी असतात.प्राथमिक गरजा भागविण्या एव्हढे भांडवल म्हणजे पूंजी आपल्याकडे असली तरी त्यावर समाधानी नसतात,त्यांच्या स्वार्थाला मर्यादा नसते,ते स्वार्थाची पुढील पायरी गाठतात ती म्हणजे मोह लोभ.भांडवलवादी विचारांचे प्रवृत्तीचे लोक लोभी असतात,अधाशी असतात.यांना अधिकाधिक धनसंपत्ती हवी असते.यांना हव्याशी म्हणतात,हे मध्यमवर्गीय जीवनापुढचे जीवन म्हणजे श्रीमंतीचे जीवन जगत असतात.सुख चैन ,आराम, मौज मजा ,पर्यटन, नाच गाणी,व्यसन यामध्ये आपला पैसा खर्च करतात.चैनीच्या गरजा भागविण्यासाठी हे भ्रष्टाचार,काळाबाजार,साठेबाजी,शोषण,पिळवणूक,जास्तीत जास्त नफा मिळवण्याचे दुष्ट कार्य करीत असतात,यांचे मोठमोठे उद्योग कारखाने शेती व्यापार हॉटेल्स असतात,त्यातून ते प्रचंड नफा कमवतात,स्वतःच्या बँका पण काढतात,भरमसाठ व्याज लावतात,एकंदरीत वाम मार्गाने धनसंपत्ती जमवून आपली भांडवलशाही निर्माण करतात.हे जसे या विचाराचे व्यक्ती भांडवली व्यवहार करतात,अगदी असेच बऱ्याच देशांचे सरकार ही करीत असतात,देशातील जमीनदार भांडवलदार एक होतात,पक्ष काढतात,राजकारणात प्रवेश करतात,नाहीतर बाहेर राहून भांडवलशाहीचे राजकारण करीत असतात.देशात भांडवलशीचे सरकार आणि व्यवस्था कायम राहण्यासाठी,तिचे संरक्षणासाठी पोलिस,सैन्य, कोर्ट स्थापन करतात,की जे यांच्याच हिताची ही यंत्रणा जोपासना करीत असते.सरकार भांडवलदार जमीनदारांचे असते,म्हणूनच पुन्जिपतींच्या संपती चे ते संरक्षण करणारे कायदे करीत असते.

        अगदी याच प्रमाणे समाजवादी विचारांचे लोक,पक्ष,सरकारे देश असतात.समाजवादी विचार म्हणजे आपले स्वार्थ जपत समाजाचा देशाचा पण विचार करणे,सारे कायदे,योजना या समाजासाठी समाजाचे देशाचे रक्षण करणे,श्रीमंती कमी करणे,गरीबी नाहीशी करणे आणि देशातील साऱ्या जनतेस मध्यमवर्गीय जीवन जगण्याची व्यवस्था निर्माण करणे,या विचारांची पक्ष आणि सरकार निर्माण करणे म्हणजे समाजवादी.संसार करून परमार्थ साधणे,जनसेवा हीच ईश्वरसेवा हे विचार आणि धोरण असलेले लोक,विचार,सरकार,व्यवस्था म्हणजेच समाजवाद होय.देशाची नैसर्गिक साधन संपती म्हणजे जल जंगल जमीन याचे साऱ्यांना समान वाटप करणे,कारखान्यात मालक आणि कामगार यांची समान भागीदारी असणे,नफा समान वाटून घेणे.भ्रष्टाचार,साठेबाजी,काळाबाजार,व्यसन या गोष्टीना अजिबात थारा न देणे म्हणजे समाजवाद होय, समाजातील गरीबाबद्दलचा कळवला,आणि श्रीमंतना पण शत्रू न समजता,श्रीमंतांची संपती ,पैसा,धन,सोने,हे अधिकच्या नफ्यातून कमावलेले धन लोकांना वाटप करणे,गरिबाना देणे हा विचार धोरण म्हणजेच समाजवाद होय,समाजवादी विचारात दया,माया,प्रेम,बंधुभाव,सहिष्णुता,सलोखा,तडजोड असते.या गोष्टी भांडवलशाही विचारात,सरकारात,व्यवस्थेत देशात अजिबात नसतात.केवळ त्यांचा विचार इतरांशी व्यवहार करताना आपला जास्तीत जास्त फायदा कसा होईल ,नफा j.कसा होईल? याकडेच लक्ष असते.दोस्ती करताना पण हाच स्वार्थ असतो.

        साम्यवादी विचार आणि साम्यवादी धोरण,साम्यवादी सरकारे,साम्यवादी व्यवस्थेत वरील दोन्ही गोष्टी नसतात.केवळ देश आणि देशातील जनतेसाठी त्याग समर्पण,सेवा,प्रेम याच गोष्टी असतात.स्वार्थाला अजिबात थारा नसतो.खाजगी मालमत्तेचा त्याग केलेला असतो.नैसर्गिक आणि खाजगी मालमत्ता ही देशाची मालकी असते,म्हणजेच देशातील आम् जनतेची मालकी असते.साम्यवादी देशात देशातील प्रत्येक नागरिक हा मालक असतो,तो कुणाचाही नोकर किंवा गुलाम नसतो.तो जी काही सेवा देतो ती देशासाठी असते,स्वतःसाठी नसते.देशातील प्रत्येक माणसाची काळजी तेथील सरकार करीत असते.सर्वांना समान शिक्षण,समान आरोग्यसेवा,समान अन्न वस्त्र निवारा असतो.प्रत्येकातील सुप्तगुणाना संधी असते,प्रत्येकाची क्षमता,कौशल्य , प्रतिभा,आवड या नुसार प्रत्येकास काम आणि दाम मिळते,साम्यवादी देशात आणि व्यवस्थेत स्वतःचे काहीच नसते,आपण स्वतः पण आपले नसतो तर आपण देशाचे आणि देशासाठीच असतो.अशा देशात कुणीही गरीब,मध्यम,श्रीमंत असे वर्ग नसतात.वर्गविहीन,जातीविहीन समाज असतो.तिथे धर्मास फारसे महत्व नसते.देव आणि धर्म मानायचा पळायचा याचे स्वातंत्र्य असले तरी ती खाजगी बाब समजल्या जाते. नास्तिक असलेल्यांना कुणी शिव्या देत नाहीत,कुणी त्यास वाईट समजत नाहीत,आस्थिकता एव्हढेच त्यांची तिथे किंमत असते.नास्तिक आस्तिक हा भेदभाव साम्यवादात नसतोच.

          भ्रष्टाचार,नफेखोरी,काळाबाजार, गुन्हेगारी,चोरी,मारामारी,आर्थिक सामाजिक विषमता,भेदभाव ,अन्याय अत्याचार ,खूनखराबी ,कौटोंबिक कलह या साऱ्या विकृत गोष्टी ह्या भांडवलशाही ची उपज निर्मिती आहे.या गोष्टी समाजवादात आणि साम्यवादात नसतात.कारण या दोन्ही विचारात स्वतःच्या स्वार्थापेक्षा देशाचे आणि समाजाचे हित जोपासण्याचा प्रयत्न असतो.म्हणून भानवलशाही विचारांची व्यक्ती,सरकार,पक्ष ,देश हे सत्य अहिंसा शांती चे शत्रूच समजले पाहिजे.म्हणून अशा लोकांची संगत दोस्ती करता कामा नये.समाजवादी किंवा साम्यवादी विचारांच्या व्यक्तीशी आणि सरकारशी आणि देशाशीच आपली दोस्ती असली पाहिजे.

        लेखक : दत्ता तुमवाड

           सत्यशोधक समाज नांदेड.

     दिनांक: 3 जून 2025.फोन: 9420912209.