Home Crime ईडीचे उपसंचालक चिंतन रघुवंशी यांना अटक..  — उद्योजकाकडून 20 लाखांची लाच...

ईडीचे उपसंचालक चिंतन रघुवंशी यांना अटक..  — उद्योजकाकडून 20 लाखांची लाच घेताना सीबीआयची कारवाई….

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक..

      दिल्लीमध्ये सक्तवसुली संचालनालय (ईडीच्या) उपसंचालकाला उधोजकाकडून लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.चिंतन रघुवंशी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ही कारवाई केली आहे.

      केंद्रीय अन्वेषण विभागाने दिलेल्या माहितीनुसार,सक्तवसुली संचालनालयचे उपसंचालक चिंतन रघुवंशी यांनी भुवनेश्वर येथील खाण उद्योजकाकडून 5 कोटींची लाच मागितली होती आणि 2 कोटींवर व्यवहार ठरला होता.

        हवाला प्रकरण सेटल करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.यापैकी 20 लाख रुपये घेताना रघुवंशी यांना सीबीआयने रंगेहाथ पकडले.त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर लगेचच त्यांना अटक करण्यात आली.

        ईडीचे संचालक,उपसंचालक,अधिकारी भ्रष्ट असतील तर त्यांच्या चौकशीवर नागरिकांनी विश्वास कसा काय ठेवायचं हेच कळायला मार्ग नाही.