ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : सध्या साकोलीच्या प्रत्येक सोशल मिडीयातून एक “आठवणींच पान” हा विद्यार्थ्यांचे बालपण दाखविणारा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ही संकल्पना येथील युवकांनी साकारली असून जुन्या आठवणींना उजाळा मिळावा यासाठी एक लघुचित्रपट तयार होत असून यात काही लहान बालकांनीही भुमिका साकारली आहे हे विशेष.
साकोलीच्या मातीला सलाम “आठवणींच पान” ही साकोलीची पहिली शॉर्ट फिल्म आता इंस्टाग्रामवर उपलब्ध झाली आहे. साकोली सारख्या छोट्या शहरातून मोठ्या स्वप्नांची सुरुवात झाली आहे. ‘आठवणीचे पान’ या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून साकोलीच्या युवा प्रतिभांनी एक भावनिक आणि हृदयस्पर्शी कथा साकारली आहे. विशेष म्हणजे ही साकोलीमधून बनलेली पहिली शॉर्ट फिल्म आहे, ज्याचा इंट्रो सध्या “साकोली वाले” इंस्ट्राग्रामवर व्हायरल झाला आहे.
या कलाकृतीचे लेखन आणि दिग्दर्शन आयुब खान यांनी केले आहे. त्यांच्या कल्पकथेतून ही कथा सजीव झाली आहे. ज्यामध्ये दिग्दर्शन व कॅमेरा अँगल्समध्ये संकल्प वैद्य, यांनी. या लघु फिल्म मध्ये प्रमुख भुमिकेत अनिकेत कानेकर, अनिकेत जनबंधू, सानिया राहुले, हर्षद आंबेडारे, रचित चेडगे, कल्याणी पटले व विराज वलथरे यांनी.
ही कथा आहे एका तरुणाची, जो शहरात काम करतो पण त्याच्या मनात गावाकडच्या शाळेच्या आणि बालपणीच्या आठवणी सतत जाग्या असतात. अखेरीस तो आपल्या गावात परततो आणि जुन्या आठवणींना नव्याने उजाळा देतो.
सदर लघुपटात सहाय्यक अजय गजभीये, काश्मित भेंडारकर, आर्यन श्राध्ये यांचे मोलाचे सहभाग आहे. साकोलीच्या पहिल्या शॉर्ट फिल्मचै पहिले व दूसरे ट्रैलर साकोलीतील सोशल मिडीयातून प्रत्येक युवक युवतींमध्ये तुफान व्हायरल होत असून हा पहिलाच “आठवणींच पान” लघुचित्रपट तयार करणाऱ्या “साकोली वाले” यांना महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने यशस्वी शिखर गाठण्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.



