उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
नगरपरिषद मूल येथे जागा भरणे आहे अशी अनधिकृत जाहिरात काही दिवसांपुवीं व्हाॅटसऑप वर प्रसिद्ध करण्यात आली.या जाहिरात संबधाने शहरातील काही युवकांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना विचारणा केली.
काहितरी घोटाळा होत असल्याचे लक्षात घेऊन सदर जाहिरात अनधिकृत आल्याचे मुल न.प.मुख्याअधिकारी यांनी स्पष्ट केले.२० में ला तशी प्रेस नोट काढून नगरपरिषद मुल आस्थापनेवरील कोणत्याही पदाकरीता पदभरती निघालेली नाही हे नगर वासियांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान या कालावधीत नोकरीचे आमिष दाखवून मोठा चुना लावण्यात आल्याची बोंब सुरू झाली व फसवणूक झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.आता सुशिक्षित बेरोजगारांना ” चुना लावणारे ते “रंगीले ” कोण? यावर मोठी कुजबुज सुरू आहे.
फसवेगिरी करणाऱ्या त्या महाभागांची चर्चेतून शोधाशोध जोरात सुरू आहे.ज्यांची मोठी फसवणूक झाली ती मंडळी गप्प असली तरी चुना लावणारे या फसवणूक नाट्यातील रंगीले दुसरे तिसरे कुणी नसून न.प.मध्ये काम करणारे दोन कर्मचारी असल्याची खमंग चर्चा मूल नगरात सुरु आहे.
यात एक नियमित कर्मचारी व दुसरा कंत्राटी पद्धतीने काम करणारा युवक असल्याची जोरदार चर्चा आहे.नौकरीचे आमिष दाखवून लाखोंनी गंडविणाऱ्यांपैकी एक कंत्राटी पद्धतीने काम करणारा युवक चार चाकीची वारी करुन बेरोजगार तरुणांच्या नोटावर रंगेली करीत असल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे.
बेरोजगार तरुणांना चुना लावणाऱ्यांमध्ये अजून किती रंगीले सामिल आहेत हे सांगता येत नाही.मात्र सध्यातरी दोन लबाडांची चर्चा शहरभर सुरू आहे.या संबधाने पोलिस तक्रार दाखल झाली नसल्याने प्रकरण सध्यातरी गुलदस्त्यातच आहे.
बनावट जाहिरात बनवून सुशिक्षित बेरोजगारांना न.प. अंतर्गत नौकरीचे आमिष दाखवून लुबाडणूक करण्याची मुल येथील ही पहिली घटना घडली असल्याचे बोलले जाते.
सुशिक्षित बेरोजगार तरुणांना लुबाडणाऱ्यांची कुंडली चर्चेतून बाहेर येत आहे.मात्र अजूनतरी अधिकृत पणे ही नावे बाहेर आलेली नसल्याने हे महाभाग कोण? ही उत्कंठा शहरात कायम आहेच.अजूनही पोलीसात तक़ार का नाही?
न.प.अंतर्गत नौकरी लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना लुबाडण्याकरीता खोटी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली.न.प.मुख्य अधिकाऱ्यांनी सदर जाहिरात बेकायदेशीर व चुकीची असल्याचे स्पष्ट केले.
मात्र न.प.प्रशासनाने दिशाभूल करणाऱ्या व लुबाडणाऱ्यांना इंगा दाखविण्याकरीता पोलीसात तक्रार का दाखल केली नाही हा सवाल कायम आहे.
बेरोजगार तरुणांना लुबाडल्याची बोंब सुरू आहे.कुणी फसवेगिरी केली यावर शहरात जोरदार कानाफुसी सुरू आहे.
मात्र लुबाडल्या गेलेल्या युवकांनी अजूनही पोलीस ठाणे न गाठल्याचे संभ्रम कायम आहे.
भविष्यात अशा ठकबाजांना स्थान मिळू नये व यांचे चेहरे जगापुढे यावे याकरीता न.प.प्रशासनाने व बेरोजगार तरुणांनी पोलिसात जावे व अध्याय संपवावे अशी नगरवासियांची अपेक्षा आहे.



