Home Maharashtra सती नदीवरील पुराच्या गंभीरतेची आमदार रामदास मसराम यांनी केली चाचपणी…

सती नदीवरील पुराच्या गंभीरतेची आमदार रामदास मसराम यांनी केली चाचपणी…

राजेंद्र रामटेके 

विशेष प्रतिनिधी..

तालुका कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील सती नदीवरील पूर नियंत्रण आणि संरक्षक कामांची आमदार श्री.रामदासजी मसराम यांनी नुकतीच पाहणी केली.

       या पाहणी दौऱ्यात त्यांनी कामाच्या दर्जाबाबत माहिती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

         यावेळी तहसीलदार रमेश कुंभरे,नायब तहसीलदार राजकुमार धनबाते,सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता अनिल गिरनाळे उपस्थित होते.

         यासोबतच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट,माजी सभापती परसरामजी टिकले,जयंत हरडे,माजी सभापती गिरिधर तीतराम,आणि सामाजिक कार्यकर्ते जावेद शेख,सिराज पठाण यांची उपस्थिती होती.